Pune Vidyapeeth Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Vidyapeeth: शिक्षकांची माहिती अपलोड करा, अन्यथा प्रवेश बंद; पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय

Pune Vidyapeeth Big Decision: पुणे विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता शिक्षकांची माहिती बीओडी पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे.

Siddhi Hande

पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय

शिक्षकांची माहिती अपलोड करणे अनिवार्य

शिक्षकांची माहिती अपलोड न केल्यास विद्यार्थ्यांचा प्रवेश बंद

शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.पुणे विद्यापीठाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ८ मे पर्यंत शिक्षकांची माहिती अपलोड करण्यास सांगितले आहे.जर शिक्षकांची माहिती अपलोड केली नाही तर प्रवेश बंद केला जाईल. पुणे विद्यापीठाने महाविद्यालयांना इशारा दिला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये पन्नास टक्के शिक्षक असल्याची माहिती बीओडी पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक केले आहे. जेणेकरुन सर्व शिक्षकांची माहिती मिळेल.

विद्यापीठाची मान्यता असलेल्या शिक्षकांची किमान संख्या एकत्रितपणे 50 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर त्या विद्यालयाना इशारा देण्यात आला आहे. अशा संलग्नित महाविद्यालय, मान्यताप्राप्त परिसंस्थेतील अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाचे विद्यार्थी प्रवेश शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये थांबविण्यात यावेत, असा निर्णय विद्यापीठाच्या विद्यापरिषदेने जानेवारी मध्ये घेतला होता आहे. त्याची अंबलबाजवणी लवकरच केली जाईल.

दरम्यान संबंधित महाविद्यालयांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांना 18 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण न केल्यास महाविद्यालयांना काहीही म्हणायचे नाही. असे समजून महाविद्यालयातील प्रथम वर्षाचे प्रवेश थांबविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे महाविद्यालयांचे नुकसान होऊ शकते.

विद्यापीठातील महाविद्यालयात शिक्षकांची संख्या जेवढी आवश्यक आहे तेवढी असावी. विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी शिक्षक असावेत. याचसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षकांची माहिती अपलोड केल्यानंतरच प्रवेश सुरु राहणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT