Mayuri Jagtap Hagawane Saam TV News
मुंबई/पुणे

Mayuri Jagtap Hagawane : सासरच्यांकडून मारहाण, कपडे फाडले, सासऱ्याने छातीला हात लावला; वैष्णवीची जाऊ मयुरीच्या आईचा खळबळजनक आरोप

Mayuri Jagtap Hagawane : अशा प्रकारच्या धमक्या देऊन आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. तरीसुद्धा आम्ही सामंजस्याने हा वाद मिटवत होतो', असं मयुरीच्या आईने पत्रात म्हटलं आहे.

Prashant Patil

पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी हगवणे हिचादेखील हगवणे कुटुंबाकडून म्हणजेच सासरच्यांकडून छळ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे याबाबत मयुरीच्या आईने राज्य महिला आयोगाकडे पत्राद्वारे तक्रार केली होती, अशी माहिती आता समोर येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत खुलासा केला आहे. अंजली दमानिया यांनी एक्सवर (X) याबाबतचे पुरावे शेअर केले आहेत. दमानिया यांनी मयुरीची आई लता जगताप यांनी राज्य महिला आयोगाला पाठवलेल्या पत्राचे फोटो शेअर केले आहेत. हे पत्र मयुरीच्या आईकडून राज्य महिला आयोगाकडून ईमेल करण्यात आलं होतं. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी याबाबतचा ईमेल करण्यात आला होता. अंजली दमानिया यांनी या प्रकरणी राज्य महिला आयोगाला प्रश्न विचारले आहेत.

'महिला आयोग यावर काय स्पष्टीकरण देणार का? वैष्णवीचा जीव वाचला नसता का? वैष्णवीची जाऊ, मयूरी, हिने महिला आयोगाला ईमेल करून तिला मारहाण केली, तिच्या सासऱ्यांनी छाती जवळ हात लावून कपडे फाडले. शिवीगाळ केली, ह्याचे पुरावे, FIR, फोटो आणि तिच्या आईने लिहिलेली चिठ्ठी पाठवली. ती चिठ्ठी सुद्धा मी जोडत आहे. आमचा मेहुणा मोठा पोलीस अधिकारी आहे, आमच्या मागे मोठा राजकीय पाठिंबा आहे असा त्या चिठ्ठीमधे उल्लेख आहे. महिला आयोगाने यावर कारवाई का नाही केली? याचं उत्तर हवं आहे. वेळच्यावेळी ही कारवाई झाली असती तर आज वैष्णवी सुद्धा जिवंत असती', अशा शब्दांत अंजली दमानिया यांनी सुनावलं आहे.

पत्रात मयुरीच्या आईचे आरोप

'माझी मुलगी सौ. मयुरी सुशील हगवणे हिचे २० मे २०२२ रोजी श्री. सुशील राजेंद्र हगवणे (रा. भुकुम ता. मुळशी) यांच्याशी विवाह झाला. लग्नाच्या काही कालावधीनंतर तिचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे यांनी आम्हाला फॉरच्यूनर पाहीजे आणि पैसे पाहिजे अशा मोठ्या गाड्यांच्या आणि रोख रकमेची मागणी करुन तिला त्रास देऊ लागले. तिचे पती घरी नसताना ह्या घटना वारंवार घडत होत्या. नंतर तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांनी तिला मारहाण केली आणि सांगितलं की, तुला वडील नाहीत, तुझ्या अपंग भावास आणि आईस आम्ही मारुन टाकू. आमच्याकडे बंदुका आहेत. काही वाकडं करु शकत नाही. माझा मेहुणा मोठा पोलीस अधिकारी आहे. आमच्यामागे मोठा राजकीय पाठिंबा आहे. अशा प्रकारच्या धमक्या देऊन आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. तरीसुद्धा आम्ही सामंजस्याने हा वाद मिटवत होतो', असं मयुरीच्या आईने पत्रात म्हटलं आहे.

'६ नोव्हेंबर २०२४ रोजी तिचे पती घरी नसताना सासू, सासरे, दिर आणि नणंद यांनी तिला मारहाण केली. तिचे कपडे फाडले, तिच्या छातीला सासऱ्याने हात लावला, आणि दिराने मुलीच्या अवघड जागी लाथ मारली. तुला मुलगा होत नाही तर आमच्या ये, या भाषेत मुलीला शिवीगाळ केली. हे सर्व होत असताना मुलीने मोबाईलमध्ये रेकॉर्डींग सुरु होती. हे कळताच तिचा दिर शशांक राजेंद्र हगवणे यांनी तिचा मोबाईल हिसकावून पळ काढला. मुलीने त्याच परिस्थितीत त्याचा पाठलाग केला. ही घटना सदर ठिकाणच्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्डसुद्धा झाली आहे. तिच्याकडे कोणालाही संपर्क करण्यासाठी साधन नसल्यामुळे हतबल परिस्थितीमध्ये पोलिसांत तक्रार दाखल करु शकत नव्हती. याचा फायदा घेत तिच्या सासू आणि नणंद यांनी पोलीस स्टेशनला मुलीची तक्रार दिली. इतर अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या अर्जात नमूद करता येणार नाही', असं मयुरीच्या आईने पत्रात म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT