How Shashank and Sushil Hagavane got arms license  Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Crime : हगवणे बंधूंचा शस्त्र परवान्यासाठी केविलवाणा प्रयत्न, लायन्सससाठी धडपड; हगवणे कुटुंबाचा पुण्यात नको तो कारनामा

Pune Crime News : सुशील हगवणे आणि शशांक हगवणे या दोघांकडील असलेल्या शस्त्राचा आणि शस्त्र परवान्याबद्दल आधीच वाद सुरू असताना या दोन्ही भावंडाचा आणखी एक कारनामा समोर आला आहे.

Prashant Patil

अक्षय बडवे, साम टिव्ही

पुणे : सुशील हगवणे आणि शशांक हगवणे या दोघांकडील असलेल्या शस्त्राचा आणि शस्त्र परवान्याबद्दल आधीच वाद सुरू असताना या दोन्ही भावंडाचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. आपल्याला केवळ शस्त्र परवाना मिळावा यासाठी या दोघांकडून चक्क पुणे पोलिसांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोघांनी देखील चुकीचा पत्ता देऊन हा शस्त्र परवाना मिळवला असल्याची बाब समोर आली असून आता पुण्यातील कोथरूड आणि वारजे पोलीस स्टेशनमध्ये या दोन भावंडाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शस्त्र परवाना मिळवताना आधी या दोन्ही भावांनी कोथरूड आणि वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक एग्रीमेंट बनवून घेत, आपण मूळ याच पत्त्यावर राहत असल्याचं भासवलं, आणि हे शस्त्र परवाने मिळवले. याच प्रकरणी आता पुणे पोलिसांनी या दोन्ही भावंडावर गुन्हा दाखल केला आहे.

कसा घेतला हगवणे बंधू यांनी पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना?

१२ ऑक्टोबर २०२२ : वारजे येथे सागर दांगट यांच्याशी भाडेकरार

१ बीएचके फ्लॅटसाठी साडेतीन हजार रुपये भाडं आणि १० हजार रुपये डिपॉझिट

१३ ऑक्टोबर २०२२ : शस्त्र परवान्यासाठी पोलीस आयुक्तालयात अर्ज

१७ ऑक्टोबर २०२२ : अर्ज पडताळणीसाठी वारजे पोलीस ठाण्यात

१५ नोव्हेंबर २०२२ : कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर अर्ज सहीसाठी पुणे पोलीस आयुक्तालयात

शस्त्र परवान्याच्या एनओसीवर वडील राजेंद्र हगवणेची सही

२२ नोव्हेंबर २०२२ : आयुक्तांची मंजुरी, अप्पर पोलीस आयुक्तांची अर्जावर सही, शशांकला मिळाला परवाना

कसा मिळवला सुशील हगवणेने शस्त्र परवाना?

२८ सप्टेंबर २०२२ : कोथरूड येथे अनंत कंधारे यांच्याशी भाडेकरार

१ रूम किचन फ्लॅटसाठी ५ हजार रुपये भाडं, १० हजार डिपॉसिट

३० सप्टेंबर २०२२ : शस्त्र परवान्यासाठी कोथरूड पोलीस ठाण्यात अर्ज

१९ ऑक्टोबर २०२२ : कोथरूड पोलिसांकडून अर्ज पोलीस आयुक्तालयात

१ नोव्हेंबर २०२२ : पोलीस आयुक्तांची मंजुरी, अप्पर पोलिसांची सही, सुशीलला मिळाला परवाना

शस्त्र परवान्याच्या एनओसीवर पत्नी मयुरी हगवणे यांची सही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: समृद्धी महामार्गामुळे वारंवार पूर येत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

Maharashtra Politics: हनी ट्रॅपचा मुद्दा गाजत असतानाच खडसेंनी पत्रकार परिषदेतच महाजनांचा तो व्हिडिओ लावला | VIDEO

Congress Leader Dies : काँग्रेस नेत्याचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; राजकीय वर्तुळात हळहळ

Atal Setu : आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास, 'अटल सेतू'मुळे सरकारच्या तिजोरीत कोट्यवधींची भर

Digestion Tips: पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी नक्की करा 'हे' उपाय

SCROLL FOR NEXT