Pune Police  Saamtv
मुंबई/पुणे

Pune Crime News: धक्कादायक! तरुणीने छेड काढणाऱ्या तरुणाच्या डोळ्यात फेकली मिरची पूड, पुण्यातील घटना

Pune Crime News: पुण्यात एका मुलीने छेडखानीला कंटाळून छेड काढणाऱ्या मुलाच्या डोळ्यात मिरची पूड फेकली आहे.

Dnyaneshwar Choutmal

Pune News: पुण्यातून एक धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. पुण्यात एका तरुणीने छेडखानीला कंटाळून छेड काढणाऱ्या तरुणाच्या डोळ्यात मिरची पूड फेकली आहे. शुक्रवारी सांयकाळी ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुणे विद्यापीठातील या तरुणीने छेड काढणाऱ्या तरुणाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर वाचनालयात हा प्रकार घडला आहे.

नेमकं काय घडलं?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थिनीची एक तरुण सतत छेड काढायचा. दोघेही एकाच विद्यापीठात शिकत होते. त्या विद्यार्थ्याच्या छेडखानीला तरुणी वैतागली होती.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर वाचनालयात तरुणीला छेड काढणारा हा तरुण दिसला. त्यावेळी या तरुणीने हा सतत छेड काढत असल्याच्या कारणाने विद्यापीठात शिकणाऱ्या या तरुणाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या घटनेने विद्यापीठ आवारात खळबळ उडाली आहे.

तारण ठेवलेला लॅपटॉप मागितल्याने दांम्पत्याला बेदम मारहाण

तारण ठेवलेला लॅपटॉप परत मागितल्याच्या कारणातून दोघांनी एका दाम्पत्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. याप्रकरणी संजय कारभारी शिंदे (वय ३१ ) आणि शंकर हरीदास साबळे (वय २०, रा. दोघेही चंदननगर) या दोघांना चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे शहरातील (Pune) गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. खंडणी, मारामाऱ्या असे प्रकार शहरात वाढताना दिसत असून असाच आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यामध्ये दोघांनी दांम्तप्याला बेदम मारहाण केल्याचे उघडकीस आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट, पुढचे ३ तास धो धो पावसाची शक्यता

Huma Qureshi Engagement : हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा? होणारा नवरा कोण?

ST Bus : एसटी महामंडळाची नवी योजना, २७ सप्टेंबरपासून होणार सुरू, तिकिट किती?

ITR Filling: कामाची बातमी! आयटीआर फाइल करण्यासाठी मुदतवाढ, सरकारने घेतला मोठा निर्णय

Rahul Gandhi : राहुल गांधींना पोलिसांनी अडवले, एसपीसोबत बाचाबाची, म्हणाले- 'तुम्ही मला तिथे...'

SCROLL FOR NEXT