Sangli Crime News : दुप्पट रक्कमचे आमिष दाखवून 83 लाखांची फसवणूक, सांगलीत महिलेसह चाैघांना अटक
Sangli Crime News : सांगली शहरातील रिचआधार मल्टी ट्रेडर्स ॲड डेव्हलपर्स एल. एल. पी. या कंपनीत आर्थिक गुंतवणूक केल्यास विशिष्ठ कालावधीनंतर रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून सांगलीसह (sangli) सोलापूर (solapur) येथील सहा गुंतवणूकदारांची तब्बल ८३ लाख ४८ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने चाैघांना अटक (arrest) केली आहे. (Maharashtra News)
पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार सतीश काका बंडगर, जयश्री सतीश बंडगर, संतोष काका बंडगर आणि अनिल मारुती आलदर (राहणार सांगली) या चौघांनी शहरात रिचआधार मल्टी ट्रेडर्स ॲड डेव्हलपर्स एल. एल. पी. नावाची कंपनी स्थापन केली होती. यामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना कमी कालावधीत चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते.
त्याला बळी पडून तक्रारदार याने कंपनीत गुंतवणूक केली. परंतु दिलेल्या मुदतीत कोणताच परतावा न दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत वारंवार पाठपुरावा करुनही कंपनीतील चौघा संशयीतांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारदाराने सांगली शहर पोलीस ठाण्यात संशयीत चौघांविरोधात तक्रार दाखल केली.
त्याप्रमाणेच कंपनीत गुंतवणूक केलेल्या संतोष नांमदेव सुरवसे (रा. जवळा ता. सांगोला, जि. सोलापूर ) यांची २३ लाख ५० हजार, प्रविण दिपक कचरे (रा. श्रीपुर ता. माळशिरस जि. सोलापूर) यांची ११ लाख २६ हजार, संगिता चंद्रकांत नलवडे (रा. आमणापुर ता. पलुस जि. सांगली) यांची ११ लाख १० हजार, सागर गिरी गोसावी (रा. अकलुज ता. माळशिरस जि. सोलापूर) यांची ३ लाख ५ हजार, अनिल एकनाथ सुर्यवंशी (रा. लंगरपेठ ता. कवठेमहांकाळ) यांची ८ लाख ५७ हजार ५०० रुपये अशी एकूण सहा ठेवीदारांची ८३ लाख ४८ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले.
आर्थिक फसवणूकीची व्याप्ती अधिक असल्याने हा गुन्हा पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या निर्देशाने आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती सांगली शहर पाेलीस ठाण्यातून देण्यात आली.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.