Pune Accident Saam TV
मुंबई/पुणे

Pune Accident: भरधाव ट्रकची दुसऱ्या ट्रकला जोरदार धडक; भीषण अपघातात २ जण जखमी

Pune Accident News: ट्रकची पुढील बाजू चेपल्याने ट्रकचालक स्टेअरिंग आणि सीटच्यामध्ये अडकून पडला होता. केबिनचा दरवाजा उघडत नसल्यामुळे दोघांनाही बाहेर पडता येत नव्हते.

Ruchika Jadhav

सचिन जाधव

Pune News:

पुण्यात दोन ट्रक एकमेकांवर धडकून भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रक समोरील ट्रकवर पाठीमागून आदळल्यामुळे झालेल्या अपघातात ट्रकचालकासह दोघेजण गंभीर जखमी झालेत.

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज बायपास रस्त्यावर नवले पुलाखाली मंगळवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झालाय. या अपघातात ट्रकमध्ये अडकलेल्या चालक आणि क्लीनरची अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केलीये.

नेमकं काय घडलं?

आज पहाटे कात्रजहून वारजेच्या दिशेने दोन मालवाहू ट्रक निघाले होते. नवले पुलाखाली आल्यानंतर समोरील ट्रकचालकाने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे पाठीमागून येणारा भरधाव ट्रक समोरच्या ट्रकवर जोरात आदळला.

या अपघातात मागच्या ट्रकमधील चालक आणि क्लीनर दोघे जखमी झाले. ट्रकची पुढील बाजू चेपल्याने ट्रकचालक स्टेअरिंग आणि सीटच्यामध्ये अडकून पडला होता. केबिनचा दरवाजा उघडत नसल्यामुळे दोघांनाही बाहेर पडता येत नव्हते.

याबाबत अग्निशामक दलाला माहिती मिळताच सिंहगड रस्ता, नवले पूल अग्निशामक केंद्राचे जवान दोन बंब आणि पीएमआरडीएच्या रेस्क्यू व्हॅनसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांना बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात, आदिती तटकरेंची माहिती

MNS worker Detained : मनसैनिकांना दादरमध्ये घेतलं ताब्यात, मुंबईतील वातावरण तापलं, हजारो कार्यकर्ते जल्लोष करत रवाना

ओवेसींचा रामाला नमस्कार; व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Businessman: गाडीतून उतरताच धाडधाड फायरिंग, प्रसिद्ध व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या; मुलालाही असंच संपवलं होतं

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकारांची फौज, कोण कोण आले?

SCROLL FOR NEXT