Pune Baner Police Bust Ganja Drugs  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात हळदीच्या पॅकेटमधून गांजाची विक्री, दोघांना अटक, असे फसले जाळ्यात; वाचा

Pune Police News : पुण्यातील बाणेर परिसरात हळदीच्या पाकिटांतून गांजा विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी १६ किलो गांजा जप्त करत दोन आरोपींना अटक केली आहे.

Akshay Badve

  • पुण्यात हळदीच्या पाकिटांतून गांजा विक्रीचा प्रकार उघड

  • बाणेर पोलिसांची कारवाई

  • दोन आरोपी अटकेत

  • एकूण १६ किलो गांजा जप्त

Pune Baner Police Bust Ganja Drugs पुण्यात उच्चभ्रू भागात हळदीच्या पाकिटांतून गांजाची विक्री होत असल्याची बातमी समोर आली आहे. या अवैध प्रकारची माहिती मिळताच बाणेर पोलिसांनी सापळा रचून हळदीच्या पाकिटांमधून गांजा विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तब्बल १६ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. अभिषेक भिका बोरसे आणि अक्षय भिका बोरसे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन तरुण बाणेर परिसरात एका दुचाकीवरून गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती बाणेर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बाणेर भागातील महापालिकेच्या जलतरण तलावाजवळ सापळा रचून या दोघांना अडवले आणि त्यांची चौकशी करायला सुरुवात केली.

झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यात एक पिशवी मिळून आली ज्यामध्ये हळदीची पाकिटे होती. या पाकिटांची तपासणी केल्यानंतर त्या पाकिटांमध्ये गांजा लपवल्याचे उघड झाले. सुरुवातीला पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सुमारे तीन किलो गांजा जप्त केला. चौकशीत आरोपींनी पिंपरी-चिंचवड येथील घरात अमली पदार्थांचा साठवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून आणखी १३ किलो गांजा जप्त केला. दरम्यान पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT