Pune Police News Saam Tv
मुंबई/पुणे

Police Death : खोलीत पेस्ट कंट्रोल केला, दारं-खिडक्या बंद; ट्रेनी पोलिसाचा गुदमरून मृत्यू, दिवाळीत दुर्दैवी घटना

Pune Police News : पुण्यात प्रशिक्षणार्थी पोलिसाचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पेस्ट कंट्रोल केलेल्या बंद रूममध्ये गुदमरून मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Alisha Khedekar

पुण्यातील आप्पा बळवंत चौकाजवळ प्रशिक्षणार्थी पोलिसाचा गुदमरून मृत्यू

पेस्ट कंट्रोल केलेल्या बंद रूममध्ये गुदमरून मृत्यू

मृताचे नाव रवींद्र बबन जाधव असून त्यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला

पोलिस तपास सुरू आहे

अक्षय बडवे, पुणे

पुण्यात प्रशिक्षणार्थी पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कदायक घडना घडली आहे. पेस्ट कंट्रोल केलेल्या रूम मध्ये जीव गुदमरल्यामुळे पोलिसाचा मृत्यू झाला आहे. सदर घटना ही पुण्यातील आप्पा बळवंत चौकाजवळ घडली आहे. मृत प्रशिक्षणार्थी पोलिसाचे नाव रवींद्र बबन जाधव असे आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास पुण्यातील आप्पा बळवंत चौकाजवळ असलेल्या सुतराम स्मृती बिल्डिंगमध्ये एक व्यक्ती घरात बेशुद्ध पडला असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली.

या खोलीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी राहत असून दिवाळी निमित्त ते गावी गेले होते. यावेळी येथील एका विद्यार्थ्याने सांगितलं की जाधव हे खोलीत राहत असून ते फोन उचलत नाहीत. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश करून पाहिले असता जाधव बेशुद्ध असल्याचे दिसून आले. पोलिसांनी आत जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी झुरळ मारण्याचे औषध ठिकठिकाणी ठेवल्याचे आढळून आले.

या खोलीत पूर्णपणे पेस्टिसाइड केलेली असून सर्व दारे, खिडक्या बंद केल्याचं दिसून आलं. परिणामी जाधव यांचा जीव गुदमरला असावा असा पोलिसांना संशय आहे. दरम्यान पोलिसांनी जाधव यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत असून जाधव यांच्या मृत्यूमागे नेमकं कारण काय हे अद्यापही समोर आलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pineapple Cuting Tips : घरच्या घरी अननस कसा कापायचा?

Shocking News : धक्कादायक! रिक्षाचालकाचं भयंकर कृत्य, नववीतील विद्यार्थ्यावर नेलकटरनं हल्ला

Palghar Tourism : वीकेंडला फिरायला परफेक्ट डेस्टिनेशन, डहाणू ट्रेन पकडा अन् थेट पोहचा 'या' लोकेशनला

Navi Mumbai: ख्रिसमसपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा; जाणून घ्या उड्डाणांचे वेळापत्रक अन् संपूर्ण ऑपरेशन

Maharashtra Live News Update: गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे शक्ती प्रदर्शन करीत काँग्रेसने भरला नगराध्यक्ष पदाचा अर्ज

SCROLL FOR NEXT