पोलिसांनी गाडी सकट दुचाकीस्वाराला भरले टेम्पोत
पोलिसांनी गाडी सकट दुचाकीस्वाराला भरले टेम्पोत सागर आव्हाड
मुंबई/पुणे

पोलिसांनी गाडी सकट दुचाकीस्वाराला भरले टेम्पोत; पहा Video

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे: वाहतूक पोलिसांनी (Trafic Police) नाना पेठ परिसरात (Nana Peth) एका दुचाकीस्वाराला गाडीसकट टेम्पोत भरले, ही घटना गुरूवारी पावणे-पाचच्या सुमारास घडली. यावरून भारतात लोकशाही आहे की, तालीबानी कारभार, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. चौका-चौकात ग्रुपने ठिय्ये मारून ये-जा करणार्‍या चाकरमान्या दुचाकी स्वारांना अडवून काही न काही कारणे सांगून अडविणे, त्यांच्याकडून वसुली केली जाते.

हे प्रकार शहरात सर्रासपणे घडत असताना, गुरूवारी सायंकाळी समर्थ वाहतूक पोलिस विभागाअंतर्गत असलेल्या नाना पेठ परिसरात वाहतूक पोलिसांनी गाडी सकट दुचाकीस्वाराला उचलून टेम्पोत भरले. यावेळी वाहतूक पोलिसाने दुचाकीस्वाराची गाडी नो-पार्कींगमध्ये असल्याचा दावा केला. परंतु, वाहनचालक जर चुकत असेल तर अशा चुकीच्या पध्दतीने कारवाई करण्याची चूक वाहतूक पोलिसाने करणे, तरी कुठपत योग्य आहे.

अशा कारवाई वेळी जर दुचाकीस्वार गाडीवरून पडला असता आणि त्याच्या मेंदूला मार लागला असता तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित होतो. तसेच, अशा मुजोर पोलिसावर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि वाहतूक पोलिस उपायुक्त राहूल श्रीरामे काय कारवाई करणार? हे आता पहावे लागणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi News | गर्दी गोंधळ आणि एकच राडा! राहुल गांधींच्या 'त्या' सभेत काय घडलं?

Farooq Abdullah: मोठी बातमी! फारुख अब्दुल्ला यांच्या सभेत चाकूहल्ला

Hair Removal Creams: शरीरावरील अनावश्यक केस काढण्यासाठी हेअर रिमूव्हल क्रीम वापरताय?

Today's Marathi News Live: अवकाळी पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावली

Pune Hit and Run Case | सकाळी अटक दुपारी जामीन! पुणे हिट अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT