Traffic Update SAAM TV
मुंबई/पुणे

Pune Traffic Update : पुण्याची वाहतूक कोंडी कायमची सुटणार, ३२ रस्त्यांवरचा प्रवास सुसाट होणार

Pune Traffic : पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे पोलिसांनी मिशन १५ मोहीम राबवली आहे. त्याअंतर्गत ३२ रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होणार आहे. २० ते ३० टक्के वाहतूक वेगाने होण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Pune Traffic News Today : पुण्याची वाहतूक कोंडी दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. मेट्रोचे कामामुळे त्यात आणखी भर पडली आहे. अनेक उपाययोजना करून देखील वाहतूक प्रश्न जैसे थे अशीच राहते. ठराविक वेळा आणि काही मुख्य रस्ते अशा भागात वाहतूक कोंडी पुणेकरांसाठी नित्याची झाली. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता पुणे पोलिसांनी मास्टर प्लॅन तयार केला आहे. पुणे पोलिसांकडून 'मिशन-१५' राबवण्यात येत आहे. त्यांतर्गत पुण्यातील महत्त्वाच्या १५ रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. दुसऱ्या टप्प्यात १७ रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सोडवण्यात येणार आहे. (Pune Traffic Update 15 Major Roads Set for Revamps to Ease Congestion)

वाहतूक पोलिस आणि महापालिकेने संयुक्तपणे केलेल्या उपाययोजनांमुळे सोलापूर रस्त्याप्रमाणेच शहरातील प्रमुख १५ रस्त्यांवरील वाहतूक लवकरच गतिमान होणार आहे. वाहतुकीचा वेग, तसेच सुधारणा करण्यात येणार आहे. पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवर उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यामुळे नित्याच्या वाहतूक कोंडीपासून सुटका होईल, अशी पुणेकरांना आशा आहे.

कोण कोणत्या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होणार ?

नगर रस्ता, सोलापूर रस्ता, मगरपट्टा रस्ता, पाषाण रस्ता, बाणेर रस्ता, संगमवाडी रस्ता, विमानतळ व्हीआयपी रस्ता, कर्वे रस्ता, पौंड रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी रस्ता, नॉर्थ मेन रस्ता, गणेशखिंड रस्ता आणि छत्रपती शिवाजी महाराज रस्ता- बाजीराव रस्ता, हेरिटेज वॉक यांचा त्यामध्ये समावेश आहे.

३२ रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सुटणार -

वरील रस्त्यांवरील वाहतूक विषयक कामे केल्यानंतर कोंडीची समस्या कमी होऊन वाहतूक अधिक गतिमान होईल. पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिस आणि महापालिकेच्या पथ विभागाच्या समन्वयातून 'मिशन-१५' मोहीम राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील १५ प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासह सुरक्षिततेच्या दृष्टीने कामे सुरू करण्यात आली आहेत. तीन आठवड्यात हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर लगेचच उर्वरित १७ रस्त्यांवरही ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ही माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिलीय.

सुधारणा नेमक्या काय?

– चौकांतील कोंडी दूर करणे

– पदपथावरील अतिक्रमण हटविणे

– दुभाजकांत सुधारणा

– वाहने लावण्यासाठी जागा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan : सलमान खाननं 'बिग बॉस 19'साठी किती घेतलं मानधन? आकडा वाचून पायाखालची जमीन सरकेल

Manikrao Kokate: कृषीमंत्री कोकाटेंवर कारवाईची टांगती तलवार? राजीनाम्याचं काऊंटडाऊन सुरू? CM दिल्ली दौऱ्यावर, नेमकं काय घडलं?

Diabetes without blood test: शरीरात हे ६ बदल दिसले तर समजा मधुमेह झालाय; ब्लड टेस्ट न करताही डायबेटीजचा धोका येईल लक्षात

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Accident: धुळे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, कार २०० मीटर लांब चेंडूसारखी उडाली; अपघाताचा थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT