Pune News Saamtv
मुंबई/पुणे

Pune Traffic Police: नियम मोडणाऱ्यांनो, सावधान! पुणे वाहतूक पोलीस ॲक्शन मोडवर; ७ दिवसांत ३०० वाहन परवाने रद्द

Pune Traffic Police On Action Mode News: मद्यप्राशन करुन वाहन चालवणाऱ्याचे आता थेट लायसन्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Traffic Police: वाहन चालवताना वाहतूकीचे नियम पाळण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून वारंवार केले जाते. मात्र तरीही अनेक वाहन चालक बेदरकारपणे वाहन चालवताना, सर्रासपणे वाहतुकीचे नियम मोडताना दिसतात. अनेकदा वाहन चालक मद्यप्राशन करुनही वाहन चालवताना दिसतात. ज्यामुळे विनाकारण अपघात होताना दिसतात.

अशा वाहन चालकांविरोधात आता पुणे (Pune) वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून मद्यप्राशन करुन वाहन चालवणाऱ्याचे आता थेट लायसन्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या धडक कारवाईस पोलिसांनी सुरूवातही केली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरोधात पुणे पोलिसांनी णका देण्यास सुरूवात केली आहे. या कारवाईत आत्तापर्यंत गेल्या ७ दिवसांत पुण्यातील ३०० वाहन धारकांचे वाहन परवाने रद्द केले आहेत. पुणे परिवहन प्रादेशिक कार्यालय (RTO) आणि वाहतूक पोलिसांकडूनही संयुक्त कारवाई केली आहे.

या कारवाईत मद्य प्राशन करुन वाहन चालवताना आढळल्यास परवाने सहा महिन्यांसाठी रद्द होणार आहेत. तर इतर वाहतूक नियम मोडणाऱ्यांचे वाहन परवाने तीन महिन्यांसाठी वाहतूक पोलिसांकडून रद्द करण्यात येणार आहेत.

या कारवाईत नो एंट्री, वन वे, आणि ट्रिपल सीट फिरणाऱ्या हुल्लड बजांवर तसेच वाहनांचे सायलेंसर बदलून गाड्या चालवणाऱ्यांणाही दणका देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पुणेकरांनी मद्यप्राशन करत दुसऱ्यांदाहतुकीचे नियम मोडल्यासवाहन चालकाचा परवाना कायमचा रद्द होणार आहे. त्यामुळे पुणेकरांना आता वाहतूकचीच्या नियमांचे पालन करावेच लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

SCROLL FOR NEXT