Pune Traffic Rules For New year 2026 Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : वाहतुकीत मोठा बदल! लोणावळा-खंडाळ्यात फिरायला जाताय? त्याआधी ही बातमी वाचाच

Pune Traffic Rules For New year 2026 : पुणे जिल्ह्यात नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनस्थळी मोठी गर्दी. ३० डिसेंबर २०२५च्या मध्यरात्री १२ पासून १ जानेवारी २०२६च्या मध्यरात्री १२ पर्यंत पवनानगर बाजारपेठेत वाहन बंदी व पर्यायी मार्ग लागू. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे सुरक्षा व वाहतूक बदल आदेश जारी.

Alisha Khedekar

  • ३० डिसेंबर मध्यरात्रीपासून १ जानेवारीपर्यंत पुण्यात ट्रॅफिक डायव्हर्जन लागू

  • पवनानगर बाजारपेठेत वाहन प्रवेशावर बंदी

  • जड–अवजड व स्थानिक मार्गावरील काही वाहने वगळून परवानगी

  • वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकेरी वाहतूक व पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन

नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी पर्यटनस्थळे फुलली आहेत. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नागरिकांनी वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेट देण्याचे नियोजन केले आहे. मात्र या सगळ्याचा फटका मोठ्या प्रमाणावर वाहतुकीला बसतो. मौज मस्तीसाठी बाहेर निघालेल्या पर्यटकांमुळे वाहतूक कोंडी होती. या सगळ्यावर तोडगा म्हणून पुण्यात सुरक्षिततेच्यादृष्टीने पर्यटनस्थळ परिसरात ३० डिसेंबर २०२५ रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आदेश जारी केले आहेत.

पुणे मुंबई, कामशेतकडे येणाऱ्या वाहने पवनानगर बाजारपेठेत बंदी घालण्यात येत असून येळसे ग्रामपंचायत फाटा येथून डावीकडे-शिवली कोथुर्णे गाव येथून डावीकडे-कोथुणे,मळवंडी फाट्यापासून उजवीकडे ब्राम्हणोलीकडे-वारु फाट्यावरुन पुढे सरळ ब्राम्हणोली फाटा मार्गे जवन रोडवरुन फांगणे, ठाकुरसाई, खडक गेव्हंडे, जवण, चावसर, मोरवे, तुंग अशी वाहतूक वळविण्यात येत आहे. परंतु, पवना नगर, कालेगाव, आंबेगाव, शिदगाव, पाले, धामनधरा, दुधीवरे बाजुस जाणारी वाहने तसेच जड,अवजड वाहने सोडण्यात येणार आहेत.

येळसे ग्रामपंचायत फाटा येथून डावीकडे-शिवली-कोथुर्णे गाव येथून डावीकडे-कोथुर्णे,मळवंडी फाट्यापासून उजवीकडे ब्राम्हणोलीकडे-वारु फाट्यावरुन पुढे सरळ ब्राम्हणोली एकेरी वाहतुक करण्यात येत आहे. मौजे ब्राम्हणोली, वारु, कोथुर्णे, शिवली येथील स्थानिक रहिवाशांना येळसे बाजुकडे येण्यास बंदी करण्यात आली असून, वारु फाटा-ब्राम्हणोली फाटा-पवना नदी पुल-कालेगाव फाटा-पवना बाजारपेठ मार्गे येळसे कामशेत असे जाता येईल. पवनानगर बाजारातपेठेत वाहतूक कोंडी होवू नये म्हणून जड,अवजड वाहनांना जाण्यास बंदी करण्यात येत आहे.

१ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत तुंग, मोरवे, चवसर, जवन, खडक गेव्हडे, ठाकुरसाई, फांगणेकडून पवनानगर, कामशेतकडे जाणारी वाहने काले कॉलनी पवनानगरकडे जाण्यास मनाई करण्यात आली असून ब्राम्हणोली फाटा उजवीकडे-वारु फाटा सरळ-मळवंडी,कोथुर्णे फाट्यावरुन डावीकडे-कोथुर्णे गाव उजवीकडे-शिवली येळसे ग्रामपंचायत फाटा मार्गे मुंबई पुणे, कामशेत कडे वळविण्यात येत आहे. परंतु, पवनानगर, कालेगाव, आंबेगाव, शिंदगाव, दुधीवरे बाजूस जाणारी वाहने तसेच जड, अवजड वाहनांना सोडण्यात येईल.

ब्राम्हणोलीफाटा उजवीकडे-शिवली येळसे प्रामपंचायत फाटा अशी एकेरी वाहतूक करण्यात येत आहे. वारु ब्राम्हणोली येथील स्थानिक रहिवाश्यांनी पवना नदी पूल-कालेफाटा-पवना बाजारपेठेत येण्यास बंदी करण्यात येत असून, वारु फाटा-मळवंडी, कोथुर्णे फाट्यावरुन डावीकडे कोथुर्णे गावातून पवनानगर बाजारपेठ अशी या पर्यायी मार्गे वळविण्यात येत आहे, नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करुन प्रशासनास सहकार्य करावे, असेही आदेश जारी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lemon Benefits: जेवणात लिंबू पिळून खाण्याचे फायदे काय आहेत?

Maharashtra Live News Update: पनवेल मध्ये भाजपचा उमेदवार बिनविरोध

Chocolate Coated Strawberries : सोशल मिडीया ट्रेंड स्ट्रॉबेरी डेसर्ट चॉकलेट घरच्या घरी कसे बनवायचे? वाचा सोपी रेसिपी

Pune BJP Candidate List: नातेवाईकांना डावललं, निष्ठावंतांना संधी; पुण्यात भाजपने कुणाला दिली संधी?, वाचा उमेदवारांची संपूर्ण यादी

Robotic surgery: रुग्ण मुंबईत तर सर्जन शांघायमध्ये...! ५००० किमी दूरवरून करण्यात आली भारतातील पहिली क्रॉस-बॉर्डर रोबोटिक शस्त्रक्रिया

SCROLL FOR NEXT