Pune Traffic Diversions  GOOGLE
मुंबई/पुणे

Pune Traffic: पालखी मार्गात मोठा बदल! पुणे- सासवड मार्ग पूर्णपणे राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते? वाचा सविस्तर...

Pune Road Closures : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ११ ते १८ जुलैदरम्यान अनेक प्रमुख मार्गांवरच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी प्रशासनाने सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा.

Sakshi Sunil Jadhav

Pune: श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातल्या विविध मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्ह्याधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश जारी केला असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

यंदा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी क्षी क्षेत्र आळंदी या ठिकाणाहून प्रस्थान होणार आहे. पालखी सोहळ्यादरम्यान ग्रामीण भागातला बंदोबस्त आणि भाविकांची गर्दी लक्षात घेऊन ११ ते १५ जुलै या कालावधीत काही प्रमुख मार्गांवरील वाहतूक वळवण्यात येईल.

पुणे-सासवड मार्ग बंद

११ जुलै रोजी पहाटे २ वाजल्यापासून १३ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवेघाट आणि बोपदेव घाटमार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या मार्गांवरची वाहने खडी मशीन चौक - कात्रज - कापूरहोळ मार्गे वळवण्यात येणार आहे. तर सासवडकडून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांना गराडे - खेड - शिवापूर मार्गाचा वापर करावा लागेल.

सासवड - जेजुरी - वाल्हे मार्गासाठी पर्यायी व्यवस्था

१३ जुलै पहाटे २ वाजल्यापासून १४ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे आणि निरा या मार्गांवरून ये - जा करणाऱ्या वाहनांनी झेंडेवाडी - पारगाव मेमाणे - सुपे - मोरगाव - निरा या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

वाल्हे - लोणंद टप्पातही वाहतूक वळवणार

१५ जुलै रोजी पहाटे २ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुणे ते निरा आणि निरो ते पुणे या मार्गावरच्या वाहनांसाठी सासवड - जेजुरी-मोरगाव हा मार्ग ठरवण्यात आला आहे.

फलटण - लोणंद मार्गावरील वाहतुकीत बदल

१५ ते १८ जुलै या दरम्यान लोणंद आणि फलटणकडून पुण्याकडे येणारी तसेच पुण्याहून फलटण आणि लोणंदकडे जाणारी वाहतूक शिरवळ मार्ग वळवण्यात येणार आहेत. पालखी सोहळ्यादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षिततेट्या दुष्टीने हे बदल करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: राजापूरमध्ये खाडीत बुडून एकाच कुटुंबातील चार मुलांचा मृत्यू; एका मुलीला वाचवण्यात यश

Rice vs Roti: भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी रात्री जेवताना काय खावं

नवनियुक्त अध्यक्षांसमोरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हाणामारी; पक्ष कार्यालयातच एकमेकांवर भिरकावल्या चपला

October Heat Home Remedie: ऑक्टोबर हिटमुळे हैराण झालात? शरीर थंड ठेवण्यासाठी करा हे ७ सोपे घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT