Police detain accused in Theur after alleged attempt to assault a 6-year-old girl, triggering outrage in Pune district. saam tv
मुंबई/पुणे

पुणे पुन्हा हादरले! नसरापूरच्या घटनेनंतर आता थेऊरमध्ये ६ वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नराधम जेरबंद

Pune Theur Minor Girl Assault Attempt Case Details: पुण्यातील नसरापूर आणि पर्वती येथील घटनांनंतर थेऊरमध्ये ६ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Omkar Sonawane

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे: पुण्यातील नसरापूर आणि पर्वती येथील घटना ताजी असतानाच, आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हवेली तालुक्यातील थेऊर येथे उन्हाळी सुट्टीसाठी आजोबांकडे आलेल्या एका ६ वर्षांच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, नागरिकांनी आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही मूळची पुणे शहरातील असून सध्या उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी थेऊर येथील आपल्या आजोबांकडे आली होती. आजोबांच्या घराशेजारी राहणाऱ्या एका ४२ वर्षीय नराधम गिरणी चालकाने या चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. लोणी काळभोर पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांत अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. नसरापूर आणि पर्वती येथील घटनांच्या पाठोपाठ थेऊरमध्ये असा प्रकार घडल्याने पालकांमध्ये भीतीचे आणि नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आरोपीवर कठोर कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT