Pune Terrorist News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Terrorist News: पुणे दहशतवादी प्रकरणात आणखी एकाला अटक, ATS ची मोठी कारवाई

Pune ATS Action: अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने या दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी मदत केली होती.

Priya More

प्राची कुलकर्णी, पुणे

Pune News: पुणे दहशतवादी प्रकरणामध्ये (Pune Terrorist Case) आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. पुण्यातल्या कोथरुड परिसरातून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्याला एकाला अटक (Pune Terrorist Arrest) करण्यात आली आहे. एटीएसने ही मोठी कारवाई केली आहे.

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने या दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी मदत केली होती. या प्रकरणाचा एटीएसकडून (ATS) कसून तपास सुरु असून आणखी धागेदोरे हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसने अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांना पुण्यामध्ये राहण्यासाठी आश्रय देणाऱ्याला बुधवारी एटीएसने अटक केली. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे दोन साथीदार मात्र अद्याप फरार आहेत. एटीएसकडून त्यांचा शोध सुरु आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून टेंन्ट जप्त करण्यात आले आहे. जंगल परिसरामध्ये राहण्यासाठी ते या टेंटचा वापर करत होते.

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीतून बुधवारी धक्कादायक माहिती समोर आली होती. या दहशतवाद्यांनी पुण्यामध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला होता. पण पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा कट उधळून लावला आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा तिसरा साथीदार शाहनवाज हा सध्या फरार आहे. शाहनवाज हा अल सफा या इसिसच्या धर्तीवर सुरू झालेल्या दहशतवादी संघटनेचा तो म्होरक्या आहे.

महाराष्ट्र एटीएसने अल सफाच्या रतलाम मॅाडेलचा पर्दाफाश केला. पुण्यातून अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवादी प्रकरणात आता गोंदियातून एकाला अटक करण्यात आले होते. त्याचे नाव कातिल दस्तगीर पठाण उर्फ अब्दुल कादीर दस्तगीर अससे आहे. कातिल हा मूळचा गोंदियाचा आहे. त्याच्यावर लॅाजिस्टकची जबाबदारी देण्यात आली होती. दहशतवाद्यांना राहण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कातिलवर होती. दोन दहशतवाद्यांच्या अटकेनंतर गोंदियामधून बुधवारी त्याला अटक करण्यात आली होती. आणखी ६ आरोपी अल सफाच्या रतलाम मॅाडयुलमध्ये सक्रिय असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी (२४ वर्षे), मोहमम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (२३ वर्षे) अशी पुण्याच्या कोथरुड भागातून अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांची नावं आहेत. हे दहशतवादी कोंढव्यातील मीठानगरमध्ये राहत होते. हे दोघेही पुण्यात बॉम्बस्फोट घडवणार होते. या दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची प्रशिक्षण आणि चाचणी केल्याची माहिती एटीएसने कोर्टात दिली होती. त्यानंतर या दहशतवाद्यांविरोधात दाखल गुन्ह्यात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (युएपीए) कलमवाढ करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT