Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Terror Attack : पुण्यात खळबळ! 'I Love Mohammad' नंतर आता 'इस्लाममध्ये संगीत हराम आहे' आशयाचे पोस्टर्स झळकले

Pune Kondhwa News : पुण्यातील कोंढवा परिसरात “इस्लाममध्ये संगीत हराम आहे” अशी वादग्रस्त पोस्टर्स लागल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस आणि एटीएसकडून रात्रीभर सर्च ऑपरेशन करण्यात आले असून १८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Alisha Khedekar

  • कोंढवा परिसरात पुन्हा वादग्रस्त पोस्टर्स लागल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे

  • “इस्लाममध्ये संगीत हराम आहे” या आशयाचे पोस्टर्स लागल्याचे समोर आले आहे

  • पोलिस आणि एटीएसकडून १९ ठिकाणी सर्च ऑपरेशन करून १८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे

  • अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखा असे प्रशासनाचे आवाहन आहे

पुण्यातील कोंढवा परिसरात पुन्हा एकदा वादग्रस्त पोस्टर्स लागल्याचे समोर आले आहे. यापूर्वी “I Love Mohammad” अशी पोस्टर्स झळकल्यानंतर आता “इस्लाममध्ये संगीत हराम आहे” अशा आशयाचे पोस्टर्स सार्वजनिक चौकात लावले गेल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. याआधी लागलेल्या पोस्टर्स मुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोंढवा परिसरात रात्रीपासून सुरू असलेल्या सर्च ऑपरेशन मुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिकांनी आता अजून एका इस्लामिक पोस्टर कडे बोट दाखवत प्रश्न उपस्थित केले आहेत. आता या पोस्टर्सकडे धार्मिक उदात्तीकरणाचा भाग म्हणून देखील पाहिले असले तरी, इतरांकडून या माध्यमातून समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचीही चर्चा सुरू आहे.

कोंढवा परिसरात गेल्या काही तासांपासून पोलिस आणि एटीएसकडून गुप्तपणे विविध ठिकाणी सर्च ऑपरेशन्स करण्यात आले आहेत.या सर्च ऑपरेशनमध्ये तब्ब्ल १८ संशयितांना ताब्यात घेतले असून एटीएसने १९ ठिकाणी छापे मारले आहेत. त्यामुळे या भागात काही इस्लामिक संघटना किंवा संशयास्पद गट सक्रिय आहेत का, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. दरम्यान या समाजकंटकांना काय शिक्षा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल

सध्या पोलिसांनी परिसरात नाकाबंदी वाढवली आहे. दरम्यान हे “I Love Mohammad” आणि “इस्लाममध्ये संगीत हराम आहे” अशा आशयाचे पोस्टर्स कोणाकडून लावण्यात आली याचा तपास सुरू आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खारमध्ये मोटारसायकल चोरी प्रकरण उघडकीस

IND vs AUS Hobart T20: भारतासमोर इतक्या धावांचे लक्ष्य , डेव्हिड स्टोइनिसच धमाकेदार अर्धशतक

Crime News : मालेगावमध्ये राडा! लहान मुलांचा किरकोळ वाद; दोन गटाचा एकमेकांवर गोळीबार

Mumbai : मुंबईत पुन्हा आढळला मतदारयादीत घोळ; एकाच व्यक्तीचे तीन EPIC नंबर, मनसेने पुरावाच दिला

धक्कादायक! साप घेऊन दुचाकीवरून प्रवास, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT