pune teen drowns in dam saam tv
मुंबई/पुणे

Pune : फिरायला जाणं जीवावर बेतलं! पुण्यातील धरणात १९ वर्षीय तरुण बुडाला, तब्बल २४ तासांनी मिळाला मृतदेह

Pune News : पुण्याजवळच्या कासारवाई धरणामध्ये एक तरुण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. २४ तास शोध मोहिम राबवल्यानंतर १९ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे शहराच्या जवळील कासारवाई धरणामध्ये एक १९ वर्षीय तरुण बुडल्याची माहिती उघडकीस आली आहे. काल रविवार (२० जुलै) सकाळी अकराच्या सुमारास हा तरुण धरणाच्या पाण्यात बुडाला होता. आज (२१ जुलै) सकाळी अकरा वाजता तरुणाचा मृतदेह मिळाला. वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग रेस्क्यू लोणावळा यांच्या मदतीने मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या जवळ असलेल्या कासारवाई तलावाच्या परिसरात मृत तरुण आणि त्याचे आणखी चार मित्र गेले होते. रविवार असल्याने सर्वांनी फिरण्याचा प्लान बनवला होता. पण हा प्लान तरुणासाठी घातक ठरला. कासारवाई धरणाच्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रविवारी सकाळी अकरा वाजता हा तरुण बुडाला. तब्बल २४ तास रेस्क्यू ऑपरेशन केल्यानंतर सोमवारी अकरा वाजता त्याचा मृतदेह मिळाला. मृत तरुणाचे नाव संतोष शहाजीराव असे आहे. तो मूळचा बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मालेगाव येथील रहिवासी आहे. संतोष हा कासारवाईला फिरण्यासाठी आला होता.

पुण्यात एसटी बसच्या कंडक्टर आणि ड्रायव्हरला मारहाण

पुण्यातील शिरूर एसटी बस डेपोमध्ये पुणे ते माजलगाव प्रवास करणाऱ्या एका बसच्या कंडक्टर आणि ड्रायव्हरला काहीजणांनी बेदम मारहाण केली. लाकड्याच्या दांडक्यांनी दोघांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत देशभक्ती उजळून निघणार, ३० मीटर उंच राष्ट्रध्वजाचे भव्य लोकार्पण|VIDEO

Peanut Chocolate Recipe : फक्त ३ साहित्य वापरून बनवा कुरकुरीत आणि गोडसर शेंगदाणा चॉकलेट

Maharashtra Tourism: छत्रपती संभाजीनगरमध्ये वसलाय स्वर्ग,'ही' सुंदर ठिकाणं पाहिलीत का?

Maharashtra Live News Update: पुण्यातील शिवसृष्टी 31 ऑक्टोबर पर्यंत सवलतीच्या दारात पाहता येणार

Elephant Tramples Tourist: बापरे! पर्यटकाच्या वागण्यावर भडकले गजराज; पाठलाग करत पायाखाली तुडवलं| Video Viral

SCROLL FOR NEXT