Pune Swargate ST Depot Case Updates Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Swargate ST Depot Case : नराधम दत्ता गाडेला किती शिक्षा होणार? कायदा काय सांगतो?

Datta Gade Pune Crime : पुणे स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुणे पोलिसांनी त्याच्यावर अतिरिक्त कलमांची वाढ केली आहे. दरम्यान गाडेला कधी शिक्षा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Yash Shirke

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यातील स्वारगेट एसटी बस डेपोमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला जन्मठेप होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल पुणे क्राईम ब्रॉन्चने दत्ता गाडेवर आणखी ३ कलमांची वाढ केली. यामुळे त्याच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे म्हटले जात आहे.

पुणे पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडेवर 'पीडित महिलेचा रस्ता अडवणे, तिला मारहाण करणे आणि जबरदस्तीने २ वेळा संभोग करणे' अशा गंभीर स्वरुपाच्या कलमांची वाढ केली. हे अतिरिक्त कलम सिद्ध झाल्यास दत्ता गाडेला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते असे म्हटले जात आहे.

काल पुणे क्राईम ब्रॉन्चने दत्ता गाडेवरील कलमांची वाढ केली. पोलिसांनी गाडेवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(2) (M), 115 (2) आणि 127(2) या ३ कलमांची वाढ केली. यातील 64(2) (M) हा कलम जर सिद्ध झाला, तर दत्ता गाडेला एकाच महिलेवर वांरवार बलात्कार या गुन्हाच्या अंतर्गत दहा वर्ष ते आजीव जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

काल स्वारगेट एसटी डेपो बलात्कार प्रकरणातील दत्ता गाडेची पोलीस कोठडी संपली. त्यामुळे त्याला पुणे न्यायालयासमोर सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. पुणे सत्र न्यायालयाने दत्ता गाडेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दत्ता गाडेचा मोबाईल फोन अजूनही पोलिसांना सापडला नसल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Healthy Lifestyle : तुमच्या वयानुसार शरीराला किती प्रोटीनची गरज आहे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Curly Hair Care Tips : रोज स्ट्रेटनर वापरून कंटाळलात? करा हे सोपे उपाय; कुरळे केस होतील स्ट्रेट

Spain Migrants: स्पेनमध्ये समुद्रमार्गे हजारो नागरिकांची घुसघोरी, परिस्थिती चिघळली; १८ जणांचा मृत्यू, थरारक VIDEO

Gold Price Today : सलग दुसऱ्या सोन्याने घतली उसळी, प्रति तोळा इतक्या रुपयांवर दर पोहोचला; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT