Pune Swargate Shivshahi Case 
मुंबई/पुणे

Swargate St Depot Case : काय करायचे ते कर, मला जिवंत ठेव...दत्ता गाडेकडे पीडित तरूणीची विनवणी

Pune Swargate Shivshahi Case : शिवशाही बलात्कार प्रकरणातील पीडित तरूणीचा पोलिसांनी जबाब नोंदवलाय. तिने सांगितलेल्या प्रसंगानंतर पोलिसही थक्क झाले.

Namdeo Kumbhar

Swargate St Depot Case: स्वारगेट डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. याप्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे. पोलिसांना आरोपी दत्ता गाडे याचा मोबाईल सापडला आहे, त्याशिवाय पीडित तरूणीचा जबाबही पोलिसांकडून नोंदवण्यात आला. पीडित तरूणीने जे सांगितले, ते ऐकूण पोलिसही थक्क झाले. नराधम दत्ता गाडे अत्याचार करत होता, त्यावेळी पीडितेला कोलकाता प्रकरण आठवले. तरूणीने नराधमाकडे जिवंत ठेवण्याची विनवणी केली. (Swargate Rape Case: Victim Pleaded with Dutta Gade for Her Life After Assault)

स्वारगेट शिवशाही बलात्कार प्रकरणात पीडित तरुणीचा जबाब पोलिसांनी नोंदवला. बलात्कारानंतर जिवे मारू नये म्हणून तरुणीने आरोपी दत्ता गाडेकडे विनवणी केली. दादा, तुला काय करायचे ते कर. पण मला जिवे मारू नको, अशी विनवणी पीडित तरूणीने आरोपी दत्ता गाडे याच्याकडे केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्ता गाडे याने शिवशाही बसमध्ये तरूणीला गळा दाबून जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तरूणी घाबरली अन् गप्प पडून राहिली. तिने त्याला जिवे मारू नको, अशी विनवणी केली. तरुणीचे फलटणला जायचे तिकीट ही पोलिसांकडे पुरावा म्हणून जमा झाले आहे.

पीडिता घाबरली आहे, ती कोणताही प्रतिकार करत नसल्याचे लक्षात येताच नराधम दत्ता गाडे याने शिवशाही बसमध्ये दुसऱ्यांदा अत्याचार केल्याचे तपासात समोर आले. दादा, तुला काय करायचे ते कर, पण मला जिवंत ठेव, अशी याचना तिने नराधमाकडे केल्याची माहिती समोर येत आहे. आरोपी दत्तात्रय बसमधून उतरल्यानंतर पीडितेने गावाकडे जात असताना मित्राला आणि बहिणीला आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. त्यांनी तिला धीर दिला अन् पोलिसांत तक्रार करण्यात सांगितले.

शिवशाही बसमध्ये दत्ता गाडे याने पीडित तरूणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, पण आरोपी आक्रमक झाला.त्याचे आक्रमक रूप पाहिल्यानंतर तरूणी घाबरली. भेदरलेल्या अवस्थेत दत्ता गाडेला दादा मला जिवे मारू नको अशी विनवणी केली होती. दत्ता गाडे याने गळा दाबून जिवे मारण्याची धमकी पीडित तरूणीला दिली होती, अशी माहित समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Shape : तुमचा चेहरा कोणत्या आकाराचा? ही ट्रिक वापरा अन् लगेच ओळखा

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

अंमली पदार्थ अन् २ बायका, फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी; खडसेंच्या जावयाला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं | VIDEO

Saiyaara Box Office Collection : जगभरात 'सैयारा'ची जादू कायम, २०० कोटींच्या क्लबमध्ये केली एन्ट्री

Infertility treatment: गर्भधारणेमध्ये अडथळा येत असलेल्या महिलांसाठी 'ही' थेरेपी ठरेल आशेचा किरण; पाहा काय आहे ही थेरेपी?

SCROLL FOR NEXT