Pune Solapur Highway Accident: Saamtv
मुंबई/पुणे

Pune Solapur Highway Accident: उरुळी कांचनजवळ तीन वाहनांचा भीषण अपघात; ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

Accident News: टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व तो चारचाकी गाडीवर जाऊन आदळला..

Dnyaneshwar Choutmal

Pune Solapur Highway Accident News: पुणे - सोलापूर (Pune Solapur Highway Accident) महामार्गावरील खेडेकर मळा परिसरात आयशर टेम्पो, चारचाकी कार व दुचाकी यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात २ गंभीर जखमी झाले असून ७ जण किरकोळ जखमी झाले आहेत. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Pune Solapur Highway Accident Near Urli Kanchan)

तीन वाहनांचा अपघात...

याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातातील आयशर टेम्पो हा पुण्याकडे (Pune) निघाला होता. तर दुसरी चारचाकी गाडी हि सोलापूरच्या (Solapur) दिशेने निघाली होती. या टेम्पोमध्ये बांधकामाच्या लोखंडी प्लेट होत्या. यावेळी टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व तो थेट सोलापूरच्या बाजूने निघालेल्या चारचाकी गाडीवर जाऊन आदळला.

यावेळी या टेम्पोने शेजारुन निघालेल्या एका दुचाकीलाही धडक दिली. अपघात (Accident) एवढा भीषण होता कि टेम्पो हा चारचाकी गाडीच्या बोनेटवर जाऊन थांबला. तसेच या धडकेत दोन्ही गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

यावेळी गाडीत असलेल्या पती -पत्नी व त्यांच्या दोन मुलांना किरकोळ मार लागला आहे तर टेम्पोतील दोघेजण गंभीर जखमी झाले असून दुचाकीवरील व्यक्तीही जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातातील जखमींना कस्तुरी प्रतिष्ठान, लाईफ केअर रुग्ण वाहिकेच्या मदतीने उरुळी कांचन येथील गणराज हॉस्पिटल, सिध्दीविनायक हॉस्पिटल, झेड प्लस हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध क्रिकेटपटूची राजकारणात एण्ट्री; हाती घेतलं कमळ,भाजपमध्ये सामील होताच मिळाली मोठी जबाबदारी

Pune News : पुण्यात भाजपला धक्का! बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, राजकारणात मोठी घडामोड

फालतू भानगडी करताय! भाजपला संपवायला निघाले का? सुधीर मुनगंटीवारांची ऑडिओ क्लिप व्हायरल

Weather Update: ११ राज्यांवर पावसाचं संकट! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत तरुण-तरुणीला बेदम मारहाण; अल्पवयीन गार्डन गँगचा धुडगूस

SCROLL FOR NEXT