Pune News: पुण्यातील सिंह गडावर फिरायला आलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला चढवल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मधमाश्यांच्या या हल्ल्यात अनेक तरुण- तरुणी जखमी झाले आहेत. सिंहगडावरील टिळक बंगल्याजवळ असलेल्या तोफेच्या पॉईंट परिसरात मधमाश्यांनी हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सिंहगडावर (Sinhgad) पर्यटक गर्दी करत असतात. हजारो पर्यटक यादिवशी सिंहगडावर फिरायला येतात. त्यामुळे मोठी वर्दळ याठिकाणी पाहायला मिळते. आजच्या दिवशीही पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी गाडीतळापासून (Pune) दरवाजापर्यंत व गडावरील पायवाटांवर दाटीवाटीने पर्यटक चालताना दिसतात. अशातच टिळक बंगल्याजवळ असलेल्या तोफेच्या पॉईंट परिसरात अनेक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. सकाळपासून सातत्याने या परिसरात मधमाशा घोंगावत असताना पर्यटकांच्या सुरक्षेबाबत वन विभागाने योग्य खबरदारी न घेतल्याने अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, या ठिकाणी पर्यटकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मुली मदतीसाठी मोठमोठ्याने ओरडत होत्या. त्यांच्या संपूर्ण शरीरावर मधमाशा चिकटलेल्या होत्या. त्या वाचवा वाचवा म्हणून किंचाळत होत्या परंतु भीतीमुळे सर्वजण आपापला जीव वाचवून पळत होते, असे सांगत आपत्कालीन परिस्थितीत उपाययोजना नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.