Unseasonal Rain in Pune Saam TV
मुंबई/पुणे

Monsoon Update: पुण्यात अवकाळी पावसाच्या सुखद सरी, आणखी 'इतके' दिवस पाऊस पडणार; नागरिकांना दिलासा

Unseasonal Rain in Pune: मे महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. आता मे महिन्याच्या मध्यावर पुणे शहराला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.

Bhagyashree Kamble

मे महिन्याच्या सुरूवातीलाच राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. आता मे महिन्याच्या मध्यावर पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपून काढलं आहे. या महिन्यात १८३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली असून, शहरात मागील १८ दिवसांत ६०.७ मिमी पाऊस पडला असल्याची माहिती समोर आली आहे. जे सरासरी ११.४ मिमीच्या तुलनेत तब्बल तीनपटाहून अधिक आहे.

रविवारी (१८ मे) ला एकूण १४ अतिवृष्टी झाली असून, ज्यात पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे. तसेच शिवाजीनगर भागात ३४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मे महिन्यात गेल्या दहा वर्षांतील सर्वात मोठ्या पावसाची नोंद आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यांत उन्हाच्या झळा लोकांना बसत होत्या. उन्हामुळे शरीराची लाहीलाही झाली होती.

मात्र, मे महिन्यातच मान्सूनने जणू आगमनच केले आहे. प्रचंड उकाड्याने त्रस्त असलेल्या पुणेकरांना या मान्सूनपूर्व पावसामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. राज्याच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात महाराष्ट्रात सरासरीच्या १३४% पावसाची नोंद झाली असून, एकूण १४ जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे.

हवामान विभागाने पुढील दोन दिवसांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT