Pune Bhugaon News Saamtv
मुंबई/पुणे

Pune News: धक्कादायक! धावता धावता चक्कर आली अन्... IT कंपनीत काम करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

Pune Bhugaon News: तरुणाच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पौंड पोलिस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत.

Gangappa Pujari

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Pune Bhugaon News: धावण्याचा सराव करताना तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना भूगावमध्ये घडली. हर्षद चंद्रशेखर पिंगळे (वय ३९, रा. स्काय मानस लेक, भुकूम, ता. मुळशी) असे मृत तरुणाचे नाव असून तो आयटी कंपनीत काम करत होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Pune Latest News)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हर्षद चंद्रशेखर पिंगळे हा तरुण भूगाव परिसरात राहतो. बुधवार (१६, ऑगस्ट) रोजी भूगाव ते चांदणी चौक आणि तेथून पुन्हा भूगावपर्यंत धावण्याचा सराव करीत आले होते. भूगावला आल्यावर त्यांना चक्कर आल्यामुळे ते खाली पडले. त्यावेळी तेथून जाणाऱ्या एका टेंपोचालकाने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

परंतु डॉक्टरांनी उपचारापुर्वीच हर्षद पिंगळे यांना मृत घोषित केले. तरुणाच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पौंड पोलिस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

फुटबॉल खेळता- खेळता मृत्यूने गाठले...

दरम्यान, चार दिवसांपूर्वी मुंबईतही अशीच दुर्देवी घटना समोर आली होती. फुटबॉल खेळताना २७ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना वसईत घडली. ईनोसंट रिबेलो असे या तरुणाचे नाव असून तो वसईच्या चुळणे गावात रहात होता. इनोसंटला कसलाही आजार नसताना अचानक खेळताना हृृदयविकाराचा झटका आला, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti: नाशिकचा तिढा सुटला, पण पुण्यात महायुतीच्या जागावाटपाचं घोडं अडलं, कसा आहे जागावाटपाचा फॉर्म्युला?

घायल हूं इसलिए घातक हूं! 'धुरंधर' विराट कोहलीनं ठोकलं तुफानी शतक, विजय हजारे ट्रॉफीत दणका उडवला

Weight Loss Diet plan: न्यू एयरपासून वजन कमी करण्यासाठी डाईट करणार? मग 'हा' घ्या तुमचा डेली प्लॉन

Maharashtra Live News Update: नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी अंकली ते चोकाक भूसंपादनाचा मार्ग मोकळा

Jio Recharge: jio युजर्ससाठी खुशखबर! 84 दिवसांचा हा प्लान फक्त ६०० रुपयात, वाचा संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT