pune news Saam tv
मुंबई/पुणे

Pune Police : पुण्याच्या कोथरुडममधील मुलींना मारहाण करणं भोवलं? पोलीस निरीक्षकांसह ७ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार

Pune Police News : पुण्याच्या कोथरुडममधील मुलींना मारहाण करणं भोवल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात पोलीस निरीक्षकांसह ७ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार आहे.

Vishal Gangurde

मुलींना मारहाण करणं पोलिलांना भोवल्याचं समोर येतय

पोलिसांनी दिला होता गुन्हा दाखल करण्यास नकार

पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे : पुण्याच्या कोथरुडममधील मुलींना मारहाण करणं पोलिलांना भोवल्याचं समोर येत आहे. तीन मुलींना मारहाण आणि जातीवाचक शब्दात शिवीगाळ केल्याच्या आरोपानंतर पोलिस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात नकार दिला होता. मात्र, पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नेमकं काय घडलं होतं?

पुण्यातील कोथरूड पोलिसांनी तीन मुलींना मारहाण आणि जातीवाचक शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप मुलींनी केला होता. कारवाईच्या मागणीसाठी या पीडित मुलींनी पुणे पोलीस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन सुद्धा केलं होतं. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर, सुजात आंबेडकर, आमदार रोहित पवार यांनी त्या मुलींच्या उपस्थितीत पोलिसींची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 23 वर्षीय विवाहित महिला आपल्या पतीकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. त्या मुलीला मदत केलेल्या तीन मुलींना स्थानिक पोलिसांकडून कोणतीही पूर्वसूचना न देता ताब्यात घेतलं गेलं. तसेच त्या महिलांवर पोलीस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि लैंगिक अपमान केल्याचा आरोप मुलींनी केला होता.

कोथरूड पोलीस ठाण्याचे तात्कालीन सहायक पोलिस निरीक्षक प्रेमा पाटील, कर्मचारी श्रुती कडणे, संभाजीनगर पोलिस स्टेशनचे अमोल कामटे आणि महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे, पोलीस हवालदार विनोद परदेशी, सायबर पोलीस विभागाचे धनंजय सानप, छत्रपती संभाजीनगरचे माजी पोलीस अधिकारी सखाराम सानप यांच्यावर आता गुन्हा दाखल करावा, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. या प्रकरणाचा तपास आता सहाय्यक पोलिस आयुक्त यांनी तपास करावा असा आदेश सुद्धा कोर्टाने दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney problems: हे 1 साधं लक्षण दिसलं तर समजा लवकरच किडनी होणारे खराब, हळूहळू पोखरतं शरीर

Maharashtra News Live Update:नवीन पाणीपुरवठा योजनेत मनपावर ३०० कोटींचा अतिरिक्त भार; टप्पे कमी करण्याचे नियोजन

Petrol-Diesel Price Hike: CNG आणि LPG महागले! मग पेट्रोल-डीझेल स्वस्त की महाग? आजचे नवीन दर जारी, पाहा तुमच्या शहरातील भाव

India : भगवान शंकराचं अनोखं मंदिर! जेथे शिवलिंगावर अखंड पडत राहतं गंगाजल, जाणून घ्या कुठे आहे लोकेशन

Besan vs Milk for Face: चेहऱ्यासाठी बेसन की दूध, काय लावणे अधिक फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT