Gaurav Saam Tv
मुंबई/पुणे

Gaurav Ahuja : गाडीत अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाची कुंडली समोर, बाप लेक दोघेही गुन्हेगार

Pune crime youth obscene gestures: गाडीत अश्लील चाळे करणारा गौरव अहुजा नेमका आहे कोण? बाप लेक दोघेही गुन्हेगार, खंडणी प्रकरणी गौरवनं केली होती जेलवारी.

Bhagyashree Kamble

पुण्यातील शास्त्रीनगरमध्ये एका तरूणाचा लघुशंका आणि अश्लील चाळे करत असतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली. बड्या बापाच्या पोराचा नंगानाच म्हणत पुणेकरांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. तरूणाचे वडील हॉटेल व्यवसायिक असून, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. बाप लेक हे दोन्ही गुन्हेगार असून त्यांची जेलवारी देखील झालेली आहे.

गौरव अहुजा आणि त्याचे वडील मनोज अहुजा या दोघांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. अवघ्या २० वर्षांचा असताना गौरव अहुजावर जुगार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल होता. खंडणी, पोकर गेम , क्रिकेट सामन्यांचे बेटींग आणि मटक्याचा व्यवसाय चालवणं अशा वेगवेगळ्या स्वरुपाचे जुगाराशी संबंधित धंदे अहुजा बाप लेक करत आलेत.

या प्रकरणात मनोज अहुजावर देखील गुन्हा दाखल होऊन त्याला अटकही झाली होती. जुगाराच्या पैशातून अहुजा बाप लेकांनी हॉटेल व्यवसायात गुंतवणुक केली होती. पुण्यातील स्वारगेट भागात त्यांचं क्रीम एंड कीचन या नावाचं हॉटेल आहे. गौरवला दारूचा व्यसन आहे. पण तो आणखी नशा करतो का? याचा तपास पोलीस करीत आहेत.

लॉटरी हा अहुजा कुटुंबाचा पिढीजात व्यवसाय आहे. सध्या हे कुटुंब हॅाटेल व्यवसायाकडे लक्ष देत आहेत. क्रिकेट बेटींगच्या अवैध व्यवसायात ही अहुजांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भरचौकात अश्लील चाळे केल्या प्रकरणी गौरव अहुजाचा तपास सुरू असून, त्याचा फोन बंद असल्याची माहिती आहे. पोलीस गौरवचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

SCROLL FOR NEXT