Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Accident : पुण्यात मोठी दुर्घटना! एमआयडीसीची भिंत कोसळून कामगाराचा मृत्यू

Pune News : पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील शेड आणि भिंत कोसळून ३५ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाने मृतदेह बाहेर काढला असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. परवानगीशिवाय खोदकाम झाले का याचा तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • भोसरी एमआयडीसीत खोदकामादरम्यान शेड-भिंत कोसळून कामगाराचा मृत्यू

  • अग्निशमन दलाने मृतदेह बाहेर काढला

  • पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली

  • परवानगी आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

गोपाळ मोटघरे, पिंपरी चिंचवड

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. अंगावर शेड आणि भिंत पडून एका निष्काप कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. काल संध्याकाळच्या सुमारास भोसरी एमआयडीसी परिसरातील 'जे' ब्लॉक येथील प्लॉट नंबर ४८५ या ठिकाणी ही घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत मारुती भालेवार (३५ वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरु केले आहे.

भोसरी एमआयडीसीतील 'जे' ब्लॉक येथील प्लॉट नंबर ४८५ या ठिकाणी एका खाजगी कंपनीचा बांधकाम करण्यासाठी जे सी बी मशीनने खोदकाम सुरू होतं. हे खोदकाम करत असताना बाजूला असलेल्या 'एम एस मेटल वर्क' या कंपनीचं जुना शेड आणि भिंत कामगाराच्या अंगावर पडल्याने. मारुती भालेराव या कामगाराचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला आहे.

या घटनेसंदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य तातडीने सुरु करून मारुती भालेराव यांचा मृतदेह मातीच्या ढिगाऱ्या खालून काढला आहे. या प्रकरणात एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मात्र 'जे' ब्लॉक येथील प्लॉट क्रमांक ४८५ चा मालक एमआयडीसी आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची रीत सर परवानगी घेऊन खोदकाम करत होता का ? हे अजून स्पष्ट झालेल नाही. आता या प्रकरणात एमआयडीसी भोसरी पोलीस प्लॉट क्रमांक ४८५ चा मालक आणि त्या ठिकाणी काम करणारा ठेकेदार यावर काय कायदेशीर कारवाई करतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आठव्या वेतन आयोगाचे नवे नोटिफिकेशन जारी, मुंबईत महत्त्वाची बैठक

Mumbai Flyover: मुंबईकरांचा प्रवास सुसाट! नवीन उड्डाणपूल लवकरच होणार सुरू, कुणाला होणार फायदा?

Maharashtra News Live Update: गिरीश महाजनांची कार्यतत्परता; अपघातग्रस्त ट्रक चालकाला स्वतः मदत करत बाहेर काढले

Pitru Paksha 2026: यावर्षी पितृपक्ष कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

Traffic Update : पुण्यात गणपती विसर्जनादिवशी वाहतुकीत मोठा बदल! महत्त्वाचे रस्ते राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग कोणते?

SCROLL FOR NEXT