Pune : पक्षाच्या कामासाठी 'मी पुन्हा येईन', आपण पुन्हा-पुन्हा भेटत राहू : संजय राऊत Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पक्षाच्या कामासाठी 'मी पुन्हा येईन', आपण पुन्हा-पुन्हा भेटत राहू : संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत हे आज पुणे आणि पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आहेत. राज्यात होऊ घातलेल्या आगामी महापालिकांच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून आता शिवसेना राज्यभरात पक्ष विस्तारासाठी अन सत्तेसाठी महत्वाकांक्षी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Krushnarav Sathe

पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत हे आज पुणे आणि पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आहेत. राज्यात होऊ घातलेल्या आगामी महापालिकांच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून आता शिवसेना राज्यभरात पक्ष विस्तारासाठी अन सत्तेसाठी महत्वाकांक्षी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांवर शिवसेनेने लक्ष्य केंद्रित केले असून आज संजय राऊत यांनी भोसरी आणि वडगाव शेरी येथे आयोजित पक्षाच्या मार्गदर्शन मेळाव्यात शिवसैनिकांना ताकतीने लढण्याचे आवाहन केले आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

राजकारणात जिंकण्याची नशा पाहिजे :

वडगाव शेरी शिवसेना मार्गदर्शन मेळाव्यात बोलताना, पुणे महानगरपालिकेवर भगवा फडकावण्याचा हुंकार राऊतांनी केला आहे. राज्यभरात पक्ष विस्तार झाला पाहिजे. त्याकरता कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आणि शिवसेनेला बळकट करण्याचे आवाहन राऊत यांनी केले.

शहा-ठाकरे भेट :

दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने राज्यात चर्चांना उधाण आले आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले, कि या भेटीकडे राज्यातील सर्वांचे लक्ष लागून होते, अनेकांनी तर देव पाण्यात ठेवल्याची मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. परंतु, उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांची घेतली भेट औपचारिक असून त्यात व्यक्तिगत चर्चा झाली नसल्याची पुष्टी केली.

ठाकरे सरकार आव्हान देणाऱ्यांसाठी ठोक-रे सरकार :

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे शिवसैनिकांनी पक्षासाठी काम करणं महत्वाचं असलयाचे राऊत म्हणाले. हे सरकार पुढील तीन वर्ष व्यवस्थित चालणार असून २०२४ ला देखील मुख्यमंत्री पदी उद्धव ठाकरेच राहतील आणि ठाकरे सरकारच पुन्हा सत्तेत येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, शिवसेनेला ज्यांनी हिणवलं, आव्हान दिलं त्यांना त्यांची लागा शिवसेनेने दाखवली असून आवाहन देणाऱ्यांसाठी ठाकरे सरकार हे 'ठोक-रे' सरकार असल्याचे वक्तव्य करत, भाजपला आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

दिल्लीतही सत्ता आणायची आहे :

बाळासाहेब ठाकरे हे मुंबई नंतर सर्वात जास्त काळ पुण्यात राहिले असून पुण्यावर त्यांचे अत्यंत प्रेम होते असे राऊत म्हणाले. पुणे शहरात पाठीमागच्या काळात आपले ४ ते ५ आमदार होते, त्यामुळे येणाऱ्या काळात पुणे शहरता पक्ष मजबूत करून पुणे महानगरपालिकेवर सत्ता आणण्याची अभिलाषा त्यांनी व्यक्त केली. पुणे महापालिकेवर भगवा फडकवायचा असून, जर गुजरातचा मुख्यमंत्री देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री का होऊ शकणार नाही असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानपदी पाहायचे असून दिल्लीतही आपल्याला सत्ता आणायची असल्याचे राऊत म्हणाले.

राणे-फडणवीस-पाटील यांचा समाचार :

यावेळी बोलत असताना कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविषयी घोषणा बाजी केली असता, चंद्रकांत पाटील यांच्याकडून मी सव्वा रुपया घेणार असून, मी शिवसैनिक आहे, माझी किंमत त्यांना मोजता येणार नाही असा टोला चंद्रकांत पाटलांना लगावला. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली असता, राणेंना अटक झाली, जेवत्या ताटावरून उठवलं अजून कशावरून उठवायचं, अशी बोचरी टीका त्यांनी नारायण राणे यांच्यावर केली. भाषणाच्या शेवटी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता टोला लगावत, पक्षाच्या कामासाठी 'मी पुन्हा येईन, आपण पुन्हा-पुन्हा भेट राहू" असे राऊत म्हणाले.

By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मुंबईत रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीवर हिंदी बोलण्याची सक्ती, कर्मचाऱ्याची प्रवाशावर दादागिरी; VIDEO

Health Tips: हिवाळ्यात रोज खा मुळा, रोगप्रतिकारक शक्तीसोबत शरीरातील रक्तही वाढेल

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री होऊ नये - रामदास आठवले

Chapati Health Side Effects: तुम्हीही रात्री चपाती खाताय, तर सावधान...

Healthy Soup: हिवाळा स्पेशल डिश; उत्तम आरोग्यासाठी बनवा 'हे' गरमागरम सूप

SCROLL FOR NEXT