pune news  google
मुंबई/पुणे

Pune Crime : पुण्यात कोयता गँगनंतर आणखी एका गँगची दहशत; 'गे' व्यक्तींना निर्जनस्थळी बोलवतात अन्...

Pune Crime News : पुण्यात कोयता गँगनंतर आणखी एका गँगची दहशत पाहायला मिळत आहे. या गँगने गे व्यक्तींना टार्गेट केलं आहे. गे व्यक्तींना निर्जनस्थळी बोलावून लुटमार आणि मारहाण करत असल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे.

Saam Tv

अक्षय बडवे, साम टीव्ही

Pune News : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुण्यात सध्या कोयता गँगची दहशत आहे. या गँगच्या गुन्हेगारी कृत्यामुळे लोकांमध्ये दहशत पसरली आहे. याच पुण्यात आता आणखी एका गँगने एन्ट्री मारली आहे. 'गे' व्यक्तींना निर्जनस्थळी बोलावून लुटमार आणि मारहाण करणाऱ्या गँगने दहशत निर्माण केली आहे. या गँगमधील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पुण्यात गे डेटिंग अॅपचा गैरवापर करून लोकांना फसवणाऱ्या गँगचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. पुण्यातील नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिसांच्या पथकाने या गँगच्या काही सदस्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुण्यातील ही गँग एका अॅपद्वारे 'गे' व्यक्तीशी संपर्क साधतात. त्यानंतर डीएसके रोड ते रायकर मळा परिसरातील निर्जनस्थळी बोलवतात. गे व्यक्ती भेटायला आल्यानंतर त्याला मारहाण करत पैसे, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू लुटतात. या गँगने 'गे' लोकांमध्ये दहशत निर्माण केली आहे.

पोलिसांच्या चौकशीदरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींनी एका अॅपचा वापर करून गे व्यक्तींशी ओळख केल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी या व्यक्तींना निर्जनस्थळी भेटण्यासाठी बोलावलं. गे व्यक्ती भेटायला आल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्याकडून जबरदस्तीने वस्तू हिसकावल्या. बदनामीच्या भीतीमुळे बळी पडलेले लोक तक्रार करत नव्हते. याचा गैरफायदा आरोपी घेत होते. या गँगमधील ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

बारामतीत अल्पवयीन मुलांकडून तरुणावर कोयत्याने वार

विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात गेल्या काही काळात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. आता बारामतीत देखील याचे लोण पसरले म्हटले तर वावगे ठरणार नाही. अशीच थरकाप उडवणारी घटना बारामती तालुक्यातील पणदरे गावातील नव महाराष्ट्र विद्यालय समोर घडली आहे.

एक तरुण भांडणे सोडवायला गेला. त्याचा राग मनात धरून त्याच्यावर काही मुलांनी कोयत्याने वार करत गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निलेश रामदास जगदाळे असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. जगदाळे याच्या फिर्यादीवरून विविध कलमांनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तीन हल्लेखोर विधिसंघर्षग्रस्त मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT