
Bengaluru Crime News : बेंगळुरूमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बेंगळुरूच्या राममूर्ती नगर परिसरात एका ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळला. मृत महिलेवर लैंगिक अत्याचार करुन मग तिचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना राममूर्ती नगरच्या रामपुरा तलावाजवळ घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव नजमा असे आहे. नजमावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. त्यानंतर गळा दाबून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर ओळख पटू नये यासाठी दगडांनी तिचा चेहरा ठेचण्यात आला. त्यानंतर तिचा मृतदेह तलावाजवळ फेकण्यात आला.
नजमा ही मूळची बांगलादेशची आहे. ती कालकेरेच्या डीएसआर सोसायटीमध्ये घरकाम करते. ही नजमा विवाहीत असून तिला तीन मुलं आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ती लोकांच्या घरी कामाला जाते. ती गुरुवारपासून (२३ जानेवारी) बेपत्ता होती. तिचे कुटुंबीय तिला शोधत होते.
नजमा गुरवारी संध्याकाळी काही कामानिमित्त घरातून बाहेर पडली होती. त्या रात्री ती घरी परतली नाही. तिच्या घरच्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. नजमाचा शोध न लागल्याने तिच्या नवऱ्याने राममूर्ती नगर पोलीस ठाणे गाठले. दरम्यान पोलिसांना रामपुरा तलावाजवळ एक मृतदेह आढळला. घटनास्थळी पोहचून तो मृतदेह नजमाचाच असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. हा अपराध करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.