Pune School Saam Tv
मुंबई/पुणे

School Student : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! पुण्यात कडाक्याची थंडी, शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Pune Morning School Timing Change : पुण्यात वाढलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सकाळी जाणवणाऱ्या थंडीपासून विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

Alisha Khedekar

  • पुण्यात थंडी वाढल्याने शाळांच्या सकाळच्या वेळेत बदल

  • विद्यार्थ्यांना थंडीचा त्रास होऊ नये यासाठी शाळा व्यवस्थापनाचा निर्णय

  • पालकांकडून बदलाचा सकारात्मक प्रतिसाद

  • हवामान विभागानुसार थंडीचा कडाका कायम राहणार

सचिन जाधव, पुणे

बंगालच्या उपसागरातील दितवाह चक्रीवादळ निवळल्यानंतर राज्यात थंडीचा गारवा वाढला आहे. सकाळी वातावरणात धुकं पाहायला मिळत आहे तर दुपारी उन्हाचा कडाका जाणवतं आहे. अशातच विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सकाळच्या गारठ्यात विद्यार्थ्यांना शाळेत जायला सुद्धा त्रास होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळांमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. हा बदल विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून करण्यात आला आहे.

पुणे आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून १० अंश सेल्सिअस पेक्षा कमी-अधिक किमान तापमानाची नोंद होत आहे. परिणामी सकाळी हुडहुडी भरविणारी थंडी जाणवत आहे. सकाळच्या वेळेत जाणवणाऱ्या थंडीमुळे विद्यार्थी गारठून जात आहेत. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाने पुढाकार घेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने वेळेतील बदल केला आहे. मध्यवर्ती भागातील काही शाळांनी नियोजित वेळापत्रकात बदल केला आहे. त्यामुळे आता शाळा नियोजित वेळेपासून २० ते ४० मिनिटे उशिराने भरत आहेत. तर, काही शाळा अद्यापही वेळापत्रकात आवश्यक तो बदल करण्याच्या प्रक्रियेत आहेत.

'अत्यंत थंडीत लहान मुलांना सकाळी उठवणे आणि शाळेत पाठवणे कठीण होत होते. शाळांनी वेळ बदलल्याने मोठा दिलासा मिळाला', अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केली. मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्य संरक्षणासाठी हे योग्य पाऊल असल्याचे सर्वसाधारण मत आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस सकाळच्या वेळेत थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. परिस्थिती आणखी बदलल्यास शाळांच्या वेळेत पुन्हा सुधारणा करण्याबाबत प्रशासन सज्ज असल्याचे शाळांकडून सांगण्यात आले.

सध्या सकाळच्या वेळेत थंडीचा कडाका वाढला असल्याने लहान मुलाच्या आरोग्याचा विचार करण अत्यंत आवश्यक आहे. याच काळात शाळेत स्नेहसंमेलन आणि विविध खेळांच्या स्पर्धा सुरू असल्याने विद्यार्थी कोणत्याही उपक्रमापासून वंचित राहू नयेत आणि त्यांची तब्येतही बिघडू नये, यासाठी शाळेच्या वेळेत किरकोळ बदल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शनिवार पेठेतील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

SCROLL FOR NEXT