फुले दाम्पत्याने भिडे वाड्यात सुरु केलेली पहिली शाळा पुन्हा सुरु होणार! SaamTvNews
मुंबई/पुणे

Pune : भिडे वाड्यात पुन्हा सुरु होणार शाळा!

भिडे वाड्याचा वाद लवकरच मिटणार असून महात्मा फुले यांनी भिडे वाड्यात सुरु केलेली पहिली मुलींची शाळा पुन्हा सुरु होणार आहे.

अमोल कविटकर, पुणे

पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणजे स्त्री शिक्षणाची गंगोत्री अन् भारतातील पहिल्या महिला शिक्षिका. फुले दाम्पत्यांनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठीची पहिली शाळा सुरु करून शिक्षणाची कवाडं उघडली. मात्र, काळ सरला आणि हीच प्रेरणादायी शाळा अक्षरशः भग्नावस्थेत गेली. जागेचं प्रकरण न्यायालयात गेलं आणि खटला वर्षानुवर्षे सुरु राहिला आता मात्र हाच वाद मिटण्याच्या मार्गावर असून लवकरच भिडे वाड्यातील शाळा सुरु होणार आहे.

हे देखील पहा :

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले ज्या ठिकाणी देशातील सर्वात मोठी क्रांती घडवली तो म्हणजे भिडे वाडा. या भग्नावस्थेत असलेल्या इमारतीत जाज्ज्वल्य इतिहासाचं पर्व दडलंय. ज्या काळी महिलांना सन्मानाने जगण्याचा, समाजात वावरण्याचा अधिकारही नीट नव्हता त्या काळी फुले दाम्पत्याने थेट मुलींसाठी शाळा सुरु करण्याचं धाडस केलं. 1848 च्या जानेवारीतच मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली गेली ती ही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या भिडे वाड्यात. ज्या भिडे वाड्यात मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि आज तोच भिडेवाडा शेवटच्या घटका मोजत आहे.

भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा भरवली खरी. मात्र, तो काळ असा होता, ज्यावेळी स्त्रीने शिक्षण घेणं म्हणजे धर्मभ्रष्ट होण असं मानलं जायचं. ही शाळा सुरू करण्यासाठी, टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी फुले दाम्पत्याला करावा लागलेला संघर्ष सर्वश्रुत आहे. मात्र, तरीही या पर्वाचा ठेवा आपण जपू शकलो नाही. मात्र, आता हाच ठेवा पुन्हा समोर येणार आहे. कारण कित्येक वर्षे असणारा न्यायालयातील वाद आता मिटणार आहे. आणि लवकरच प्रेरणेचा धगधगता कुंड ठरणारी भिडे वाड्यातील पहिली शाळा पुन्हा सुरु होणार असल्याची प्रतिक्रिया इतिहास अभ्यासक आणि ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांनी दिली आहे.

फुले दाम्पत्याची शिक्षणाप्रती असलेलं निष्ठा, चिकाटी, तळमळ आणि मेहनत पाहता 1852 मध्ये इंग्रजांनी त्यांचा मेजर कँडी यांच्या हस्ते जाहीर सत्कार झाला होता. त्यांनी त्याकाळात या शाळेला सरकारी अनुदानही दिलं. फुले दाम्पत्याच्या कार्याचं महत्त्व त्यावेळी इंग्रजांना समजलं. मग आपल्या सरकारला देशाच्या पंचाहत्तरीपर्यंत हे महत्त्व का समजलं नाही? हाच खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

Manoj Jarange Warns Ajit Pawar: तुम्हाला पश्चाताप करावा लागेल; मनोज जरांगेंचा थेट अजित पवारांना इशारा

पिपाणी गेली, तुतारी राहिली! शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आयोगाचा दिलासा

SCROLL FOR NEXT