नंदुरबार : धडगाव येथे पारंपारिक बी-बियाण्यांचे प्रदर्शन
नंदुरबार : विज्ञानातून नवीन बियाण्यांचा शोध व संकरित बियाण्यांच्या दुनियेतही सातपुडा अतिदुर्गम भागात आजही पारंपारिक बियाण्यांपासून शेती करून बियाण्यांचे संकलन करून नवीन पिढीसाठी आदर्श ठेवला जात आहे. नवीन पिढीला पारंपारिक बियाण्यांची ओळख व्हावी या उद्देशाने धडगाव येथे बायफ संस्था व जनार्दन पोहल्या वळवी महाविद्यालय धडगाव येथील वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपारिक बियाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले.
हे देखील पहा :
यामध्ये पारंपारिक बियाणे संकलन करणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी भाग घेतला होता. आजच्या युगात खायला तर दूर पाहायलाही न मिळणाऱ्या अशा आधुनिक पारंपारिक बियाण्यांची मेजवानी या ठिकाणी पाहायला मिळाली. यामध्ये ज्वारी, दादर, मका, बाजरी, तांदूळ, बट्टी, हाँगरी, मुर, बादी, उडीद, चवळी, मूग, भुईमूग, हरभरा, तूर, भेंडी, बेंड्या, ढुनखा. यासोबतच फुल बिया, काकडी बिया, चारोळी, ढुल्या चिपा, चापडू, डुनखा भाजी आदी बियाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
सातपुडा अतिदुर्गम भागात आजही अनेक व्यक्ती व संस्थांकडून पारंपारिक बियाण्यांचे जतन करून शेतीसाठी उपयोगात आणले जाते. बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या संकरित बियाण्यांना फाटा देऊन पारंपारिक बियाण्यांचा नवीन पिढीने वापर करून पर्यावरण व जैवविविधता टिकविण्यासाठी पारंपारिक शेतीकडे वळावे असा संदेश या प्रदर्शनातून देण्यात आला.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.