Pune University x
मुंबई/पुणे

Pune University : 'कॅरी ऑन'च्या मागणीसाठी पुणे विद्यापीठात आंदोलन, विद्यार्थी आक्रमक

Pune : पुणे विद्यापीठात कॅरी ऑनच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला तोडगा निघणार असल्याचे संकेत आहेत. कॅरी ऑनचा निर्णय मान्य नसला तरी विद्यापीठाने विद्यार्थ्यांसमोर दुसरा पर्याय ठेवला आहे.

Yash Shirke

  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचे आंदोलन

  • 'कॅरी ऑन'च्या मागणीसाठी विद्यापीठाचे विद्यार्थी आक्रमक

  • सरसकट कॅरी ऑन नाही, पण विशेष संधी देण्याचा विद्यापीठाचा निर्णय

सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

Savitribai Phule Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'कॅरी ऑन'च्या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला तोडगा निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पुणे विद्यापीठ प्रशासनाने सरसकट 'कॅरी ऑन' मान्य न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण सर्व विद्यार्थ्यांना विशेष संधी देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे आंदोलन मिटू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

'कॅरी ऑन' ऐवजी सर्व विद्यार्थ्यांना विशेष संधी देण्यात येईल. सर्व विद्यार्थी पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे पुढील एका तासात विशेष संधीचा जीआर काढण्यात येईल, अशी माहिती परीक्षा विभागाचे संचालक प्रभाकर देसाई यांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांना एक संधी देण्यात येईल. हा निर्णय सरसरट नसेल. कोणाचेही नुकसान होणार नाही, असे वक्तव्य प्रभाकर देसाई यांनी केले आहे. पण जोपर्यंत यासंबंधित अधिकृत जीआर निघत नाही, तोपर्यंत विद्यापीठाच्या गेटसमोर आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.

पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामधील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. कॅरी ऑन संदर्भातील निर्णयावरुन विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. मागील काही महिन्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. तरीही अद्याप विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. म्हणून विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सावित्रीबाई फुले विद्यापीठामधील विद्यार्थ्यांनी कॅरी ऑन संदर्भामध्ये विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या विरोधात घोषणाबाजी केली. वॉइस ऑफ देवेंद्र या स्पर्धेसाठी परिपत्रक काढायला विद्यापीठाला वेळ आहे. पण कॅरी ऑनसाठी वेळ नाही असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या कॅरी ऑनच्या निर्णयासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरुच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

Pune Fort : पुण्याजवळ दडलाय इतिहासाचा खजिना! दोन डोंगरांवर वसलाय भव्य किल्ला

SCROLL FOR NEXT