pune  Saam tv
मुंबई/पुणे

Pune Police : पुणे पोलीस अॅक्शनमोडमध्ये; ग्रामीण भागात ७ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू, कारण काय?

Pune Police News : पुणे पोलीस अॅक्शनमोडमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे ग्रामीण भागात ७ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. काय आहे कारण? वाचा सविस्तर

Vishal Gangurde

Pune News : पुण्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दुष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी ७ फेब्रुवारी २०२५ च्या १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) आणि (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका आणि शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येतील, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणत्याही इसमाच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

सभ्यता अगर नितिमत्ता याला धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल. तसेच राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल, अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, अविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे, कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल, अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) विरुद्ध वर्तन करणे, कलम ३७ चे पोटकलम (३) अन्वये पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगी शिवाय सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे यासदेखील प्रतिबंध करण्यात आला आहे.

पोलिस प्रशासनाचा हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरीष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे व त्याबाबत परवानगी आहे त्यांना लागू होणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे धनगर समाज बांधवाची आत्महत्या

Mumbai-Pune Electric Highway : मुंबई-पुण्याचा प्रवास आता आणखी स्वस्तात, इलेक्ट्रिक हायवेमुळे होणार फायदाच फायदा, वाचा सविस्तर

SIM Card Rules: सतर्क राहा! जास्त सिमकार्ड ठेवाल तर सरकारची कारवाई, नियम मोडल्यास २ लाख रुपयांचा दंड

Shirdi Sai Sansthan: साई संस्थेच्या 47 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; शिर्डीत खळबळ, कारण काय? VIDEO

Cancer Signs: ७ लक्षणं दिसल्यास ९० दिवसांत डॉक्टरांकडे जा, कॅन्सर मुळापासून नष्ट होणार, वाचा तज्ज्ञांनी काय सांगितलं

SCROLL FOR NEXT