Pune accident news, Shirur road crash, Saam TV Marathi
मुंबई/पुणे

Pune Accident : पुण्यात मध्यरात्री भयंकर अपघात, ३ जणांचा जागीच मृत्यू, काळे कुटुंबावर काळाचा घाला

Pune Shirur accident news : पुण्यातील शिरूर तालुक्यात मध्यरात्री झालेल्या भीषण कार अपघातात चिमुकलीसह तिघांचा मृत्यू झाला असून पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

रोहिदास घाडगे, शिरूर प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Pune Shirur midnight accident details : मध्यरा‍त्री झालेल्या भीषण अपघाताने पुण्यातील शिरूर तालुका हादरला आहे. येथील निमोणे येथे मध्यरात्री एका कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एक चिमुकलीचाही समावेश आहे. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी (Latest Maharashtra road accident news) धाव घेत मदतकार्य करण्यास सुरूवात केली. पण तोपर्यंत वेळ गेला होता. या अपघातामध्ये ३ जणांचा मृत्यू झालाय. अपघातानंतर पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे. (Shirur Nhavare road accident investigation)

काळे कुटुंबावर दुखाचा डोंगर -

पुण्यातील शिरूर तालुक्यातील निमोणे येथे मध्यरात्री काळे कुटुंबावर काळाने घाला घातला. कारच्या भीषण अपघातात चिमुकलीसह ३ जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर–न्हावरे चौफुला रोडवरील नलगे वस्ती दरम्यान कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचे समजतेय. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू -

पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले आहे. अपघात नेमका का आणि कसा झाला? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. मृतांमध्ये पवन काळे, आराध्या काळे आणि बाळासाहेब नागवडे यांचा भीषण अपघातात मृत्यू झाल. या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  भीषण अपघातानंतर काळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अजितदादांच्या निधनानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा बारामतीत जनता दरबार

Kashmiri Pulao Recipe : संडे स्पेशल मेन्यू; झटपट बनवा शाही स्टाइल काश्मिरी पुलाव, चवीला लय भारी

Famous Director Death : प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा

Sharad Pawar Health Updates : शरद पवार यांची प्रकृती कशी? कधी मिळणार डिस्चार्ज? मोठी अपडेट समोर

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा, खासगी कर्मचाऱ्यांच्या पगारावरही होणार परिणाम, कसं? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT