Pune Ring Road Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Ring Road : पुणेकरांची वाहतूककोंडीची कटकट संपणार! रिंग रोडच्या कामाला सुरूवात, वाचा कसा असेल मार्ग, किती वेळ वाचणार?

Pune Ring Road Work Update: पुणे रिंग रोडचे काम आता सुरु झाले आहे. दोन टप्प्यांमध्ये हे काम होणार आहे. पुणे रिंग रोड १६८.६० किमी लांब असणार आहे. यामुळे मुंबई बंगळुरु, सातारा, सांगली प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

Siddhi Hande

पुणे रिंग रोडच्या कामाला वेग

पश्चिम कॉरिडोरचे काम सुरु

मुंबई बंगळुरु प्रवासाचा वेळ वाचणार

पुण्यातील रिंग रोडच्या कामाला वेग मिळाला आहे. पुण्यातील बाह्य रिंग रोडच्या पश्चिम कॉरिडोरवरील काम आता जलद गतीने सुरु असल्याचे दिसत आहे. रिंग रोडच्या कामाला सुरुवात होऊन जवळपास १ वर्ष झाला आहे. हा मार्ग १६८.६० किमी लांब असणार आहे. यातील बाह्य रिंग रोडचा मार्ग ११० मीटर रुंद असणार आहे. यामुळे मुंबई ते बंगळुरु प्रवासासाठी पुण्यातून जाण्याची गरज नाही. तुमचा मुंबई-बंगळुरु प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.

कसा असणार मार्ग?

पुणे रिंग रोडसाठी जवळपास ५५,६२२ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हा रिंग रोड पुण्याच्या बाहेरुन जाणार आहे. या मार्गावर आठ दुहेरी बोगदे असणार आहे. सात मार्ग, १० पेक्षा जास्त पूल असणार आहेत. २६ पूल, २१ ओव्हरपास, ९ पादचारी मार्ग मिळून हा रिंग रोड तयार केला जाणार आहे. यामधील पश्चिम कॉरिडॉरवरील काम सुरु झालं आहे. यामुळे मुंबई, बंगळुरु, पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर हा प्रवास सुसाट होणार आहे.

पुणे रिंग रोडवर संपूर्ण अंडरपास आणि ओव्हरपास बांधण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. या मार्गाच्या दोन्ही बाजूंना कुंपण असणार आहे. त्यामुळे हा प्रवास सुरक्षित असणार आहे.

दोन टप्प्यात काम

पुणे बाह्य रिंग रोडच्या प्रकल्पात दोन टप्पे आहेत. पूर्व आणि पश्चिम अशा दोन टप्प्यात काम होणार आहे. पहिला टप्पा ६५.४५ किमी लांब असणार आहे. दुसरा टप्पा १०३.१५५ किमी लांब असणार आहे. पश्चिम कॉरिडोर हा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर असणार आहे. उर्सेवरुन थेट पुणे बंगळुरु महामार्गावर शिवारेपर्यंत जोडला जाणार आहे.यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे. सध्या पश्चिम कॉरिडोरच्या भूसंपादनाचे काम पूर्ण झाला असून बांधकामाला वेग आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! जुलैपासून लागू होणार 'लँड टायटलिंग ॲक्ट'; आता प्रत्येक फ्लॅटचे मिळणार 'मालमत्ता कार्ड'

Ladki Bahin Yojana: मे महिन्याची १० तारीख उजाडली! लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० की ४५०० रुपये येणार? पाहा सविस्तर अपडेट

Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्यासोबत कडाक्याचे भांडण, महिलेने ८ व्या मजल्यावरून मारली उडी

Maharashtra Farmer Loan : कर्जमाफीचा मोठा निर्णय! ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार; सहकार विभागाची सरकारला माहिती

SCROLL FOR NEXT