Police raid at a rave party in Pune exposes drug network; separate incident at Mumbai concert raises safety concerns. saam tv
मुंबई/पुणे

पुण्यात पुन्हा रेव्ह पार्टी, पोलिसांचा छापा, वरळीत कॉन्सर्टमध्ये एकाचा संशयास्पद मृत्यू

Pune Rave Party Busted Drugs Seized Mumbai Concert Death: सरकारनं ड्रग्जविरोधात विशेष मोहीम राबवलेली असताना राज्यात रेव्ह पार्ट्या सर्रास सुरू असल्याचं समोर आलंय. मुंबई आणि पुण्यासाऱख्या शहरांत तरुणाईला अमली पदार्थांच्या विळख्यात ओढलं जातंय. पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट...

Saam Tv

राज्यात सध्या ड्रग्ज आणि रेव्ह पार्ट्यांचे पेव फुटलंय की काय अशी परिस्थिती निर्माण झालीये. पुण्यातील आळंदी-मरकळ रस्त्यावरील एका बंगल्यात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी मध्यरात्री अचानक छापा टाकलाय. गंभीर बाब म्हणजे यावेळी दारुसह अमली पदार्थ जप्त करण्यात आलेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे.

पुण्यात रेव्ह पार्टीवर छापा

पुण्यातील रेव्ह पार्टीव्हर 80 पोलिसांच्या पथकाची छापेमारी करण्यात आली असून 'प्रोजेक्ट X' नावानं पार्टी सुरू होती. या पार्टीत 107 पुरुष, 49 महिलांचा समावेश असून 21 वर्षांहून कमी वयाच्या 3 व्यक्ती आढळल्या. तसंच, घटनास्थळी 9 लाख 22 हजार किमतीची दारु सापडलीये. तर 10 प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स असलेले 3 कप पॉट्स जप्त करण्यात आलेत. अंदाजे 85 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. तसंच, आयमान शेख, यश चौधरी या आयोजकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

तर दुसरीकडे, मुंबईतील NSCI वरळी डोममध्ये लाईव्ह म्युझिकच्या कार्यक्रमादरम्यान मद्याच्या अतिसेवनामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर दुसरीकडे याच ठिकाणी एका तरुणी दारू आणि एनर्जी ड्रिंकचं सेवन केल्यामुळे बेशुद्ध पडली होती. या घटनेचे राजकीय पडसादही उमटले. रेव्ह पार्ट्या चालवणाऱ्यांवर मकोकाअंतर्गत कारवाई केली पाहिजे, अशी मागणी सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी केलीये. तर राज्यात ड्रग्जविरोधात मोहीम सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय...

खरंतर, यापूर्वी पुण्यात एक वर्षापूर्वी खराडी परीसरात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता. राज्यातील तरुणाईला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी राज्य सरकारनं ड्रग्जविरोधात धडक मोहीम राबवलीये. मात्र, राज्यात कॉन्सर्ट, रेव्ह पार्ट्यांच्या माध्यमातून तरुणाईला ड्रग्जच्या जाळ्यात ओढलं जातंय. राज्य सरकारनं अशा रेव्ह पार्टीच्या विरोधात कठोर पावलं उचलली नाही तर राज्यातील तरुण पिढी बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Life : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करण्याची सवय आहे? शरीराचे काय होते जाणून हादरून जाल

Maharashtra News Live Update: शक्तिपीठाविरोधात13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सद्बुद्धी दिंडी

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई! दूध वाढवण्यासाठी म्हशींना दिली जात होती बंदी असलेली इंजेक्शन्स

Jennifer Winget Marriage: घटस्फोटाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

Corn Appe Recipe : नाश्त्याला पोहा-उपमा खाऊन कंटाळा आला? ट्राय करा मऊशार मका आणि रव्याचे आप्पे; झटपट होईल तयार

SCROLL FOR NEXT