Pune Rave Party Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Pune Rave Party Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपींनी खराडी येथे पार्टी करण्यापूर्वी पुण्यातील आणखी दोन ठिकाणी पार्टी केली होती. खराडीत पार्टी करताना पोलिसांनी छापा टाकला.

Priya More

Summery -

  • पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात धक्क्दायक माहिती उघड

  • आरोपींनी खराडीत पार्टी करण्यापूर्वी २ ठिकाणी केली होती पार्टी

  • आरोपींनी आधी कल्याणीनगरमधील पब आणि नंतर मुंढवा येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टी केली होती

  • त्यानंतर खराडीतील स्टे बर्ड लॉजमध्ये ते पार्टीला आले

अक्षय बडवे, पुणे

पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यातील खराडीमधील पार्टीपूर्वी आरोपींच्या २ पार्टी झाल्या होत्या. पुण्यातील रेव्ह पार्टीची टाईमलाईन साम टिव्हीच्या हाती लागली आहे. पुण्यातील खराडी परिसरातील लॉजवर रेव्ह पार्टी करण्यापूर्वी आरोपींनी २ ठिकाणी पार्टी केली होती. या रेव्ह पार्टीप्रकरणी ७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या प्रकरणी एकनाथ शिंदे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांच्या नवऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खराडी येथे पार्टीला जाण्यापूर्वी काही जणांनी कल्याणीनगरमधील पबमध्ये पार्टी केली होती. कल्याणीनगरमधील पब १.३० वाजता बंद झाला. त्यानंतर आरोपी दुसरी पार्टी करण्यासाठी मुंढवा भागात असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये गेले. हे हॉटेल पंचतारांकित असल्यामुळे ३ वाजेपर्यंत पार्टीला परवानगी होती. त्यानंतर पुढची पार्टी करण्यासाठी आरोपींनी स्टे बर्ड लॉजमध्ये बुक केलेल्या सूटमध्ये पार्टी केली.

स्टे बर्ड हे खराडीमधील हॉटेल आणि लॉज आहे. या लॉजवर आरोपींची रेव्ह पार्टी सुरू असतानाच सकाळी ५ ते ६ वाजताच्या सुमारास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापेमारी केली. या रेव्ह पार्टीला ४ मिनिटांचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी दारूच्या बाटल्या, गांजा आणि हुक्का पॉट जप्त केले. या प्रकरणात पोलिसांनी ७ जणांना अटक केली. या सर्वांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रेव्ह पार्टीसाठी खराडीमधील हॉटेलचे बुकिंग खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांनीच केले होते. प्रांजल खेवलकर यांच्या नावाने लॉजमधील या रूमचे बुकिंग करण्यात आले होते. हॉटेलच्या बुकिंगच्या पावत्या समोर आल्या आहेत. २५ ते २८ जुलै पर्यंत हे बुकिंग करण्यात आले होते. रूम नंबर १०१ आणि रूम नंबर १०२ प्रांजल खेवलकर यांच्या नावाने बुक होत्या. यासाठी त्यांनी १० हजार ३५७ रुपये लॉजचे बिल भरले होते. एका रूमचे बुकिंग २५ जुलै ते २८ जुलैपर्यंत आणि दुसऱ्या रूमचे बुकिंग २६ जुलै ते २७ जुलैपर्यंत करण्यात आले होते.

खराडी पार्टीपूर्वी आरोपी कुठे गेले होते?

आरोपींनी आधी कल्याणीनगर पब आणि नंतर मुंढवा भागातील पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टी केली.

हॉटेल बुकिंग कुणी केलं?

एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या नावाने बुकिंग झाल्याची पावती समोर आली आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी काय जप्त केलं?

दारू, गांजा, हुक्का पॉट आणि अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जालना रोडवर धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

Manoj Jarange: मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर येणार की नाही? समोर आली मोठी अपडेट

Dussehra 2025: दसऱ्याला आवर्जून करा ही ३ कामे, पैशांची तंगी होईल कायमची दूर

Scheduled Caste : अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण केलं नाही, तर...; फडणवीस सरकारला कुणी दिला मोठा इशारा?

Vastu Tips: आंघोळ न करता जेवण बनवणं अशुभ असतं?

SCROLL FOR NEXT