land split in mulshi Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Rain : वाघवाडीत माळीणसारखी भूस्खलन सदृश्यस्थिती; ५०० मीटर जमीन दुभंगली

वडगाव वाघवाडी धरण शिवारात तब्बल 500 मीटर जमीन दुभंगली आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : राज्यासह पुणे जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून नदी नाल्यांना पूर आलाय. अनेक नागरिकांचं स्थलांतर देखील करण्यात येत आहे. अशातच मुळशी तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. मुळशी तालुक्यातील मौजे निंबाळवाडी आणि वडगाव वाघवाडी धरण शिवारात तब्बल 500 मीटर जमीन दुभंगली आहे. (Pune Latest News)

भूकंपाचे धक्के बसल्याने ही जमीन दुभंगली असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र भूकंपामुळे जमीन दुभंगली याला अद्यापही प्रशासनाने दुजोरा दिलेला नाही. गेल्या आठवडाभरापासून पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे मुळशी तालुक्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली.

अशातच वाघवाडीत माळीणसारखी भूस्खलन सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांना स्थलांतरित करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेत नागरिकांच्या स्थळांतराला प्राधान्य दिले जात आहे. दुसरीकडे मुळशी धरण भागात असणाऱ्या मौजे निंबाळवाडी आणि मौजे वडगाव वाघवाडी याठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के बसले असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. (Pune Marathi News)

12 जुलैपासून साधारणतः पाचशे मीटर लांब भेग पडली आहे. ही भेग पडल्याने टाटा तलावाकडील जमीन जमीन साधारणत: एक ते दीड फूट खाली खचलेली आहे. दरम्यान, या घटनास्थळी मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण आणि गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी घटनस्थळाची पाहणी केली असून हा भाग टाटा धरणाच्या हद्दीत येत असल्याने तात्पुरती मदत करण्याचे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आले आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Control Drink: रिकाम्या पोटी प्या हे 3 Morning Drinks, काही तासात होईल Blood Sugar कंट्रोल

Facebook: फेसबूक अकाउंट सुरक्षित ठेवायचं कसं? 'असं' करा प्रोफाइल लॉक

Maharashtra Live News Update: अकोल्यात तब्बल 2 तास मुसळधार पाऊस

Satara News: डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील 'त्या' खासदार आणि पीएवर कारवाई व्हावी; भाजप आमदाराची मागणी

Phaltan Name History: फलटण शहराला नाव कसं पडलं? जाणून घ्या शिवकालीन जुना इतिहास

SCROLL FOR NEXT