IMD Predict Mumbai Heavy Rain Alert Saam TV
मुंबई/पुणे

Pune Rain Update : पुणेकरांचं टेन्शन वाढलं! जून महिन्यात १० वर्षातील तिसऱ्या सर्वात कमी पावसाची नोंद

Pune Rain Stats : पुणे शहरामध्ये यंदा जून महिन्यात ८३.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Pune News : राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची स्थिती चिंताजनक आहे. अनेक ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. पुणे शहरातही यंदा कमी पावसाची नोंद झाली आहे.

पुणे शहरामध्ये यंदा जून महिन्यात ८३.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दहा वर्षांमधील या महिन्यातील हा तिसरा सर्वात कमी पाऊस नोंदवला गेला आहे.

२०१४ मध्ये केवळ १३.८ मिमी पाऊस पडला होता, तर २०२२ मध्ये ३५ मिमीची नोंद झाली होती. जुलै महिन्यातील १५ दिवस संपले असून, आतापर्यंत केवळ ४० मिमीची नोंद झाली असून ही गेल्या १० वर्षांमधील सर्वात कमी पावसाची नोंद ठरली आहे.

त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेमध्ये वाढ होणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदा पाऊस कमी असल्याचे जाहीर केले आहे. जूनमध्ये मान्सून उशिरा दाखल झाला. त्यानंतर जूनमध्ये पावसाला जोर नव्हता. जुलै महिन्यात तरी चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु अर्धा महिना संपला तरी जोरदार पावसाची प्रतीक्षाच आहे. (Latest Marathi News)

गेल्या वर्षीदेखील जून महिन्यात केवळ ३५ मिमी पाऊस झाला होता. तर जुलैमध्ये मात्र पूरस्थिती आली होती. तेव्हा ३८६ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदाही कदाचित जुलै महिन्याच्या अखेरीस जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.हवामान खात्यानेही तसा अंदाज दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Puja Mistakes: पुजा करताना 'या' चुका करु नका, अन्यथा देवी-देवता होतील नाराज

प्रांत ऑफिससमोर आंदोलन; संगमनेरमध्ये पोलीस आणि शेतकरी आमनेसामने, नेमकं प्रकरण काय? VIDEO

Marathwada University : ५५ महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेश पूर्णपणे स्थगित; शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध नसल्याने मराठवाडा विद्यापीठाचा निर्णय

अमरावतीत राजकीय भूकंप! रवि राणांच्या पक्षाची ताकद वाढली, काँग्रेससह इतर पक्षातील बड्या नेत्यांचा जाहीर प्रवेश

Viral Video: छातीत गोळी अन् डोळ्याखाली पट्टी, तरीही आंदोलनात उभा राहिला तरूण; व्हिडीओ

SCROLL FOR NEXT