Womens Protest Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: आम्ही मुख्यमंत्र्यांच्या सावत्र बहिणी, पुण्यातील पूरग्रस्त महिलांचा संताप; पाहा VIDEO

Womens Protest Against CM Eknath Shinde In Pulachi Wadi Area: पुण्यातील पूरग्रस्त महिलांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं समोर आलंय. त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात निदर्शने केली आहेत.

Rohini Gudaghe

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

पुण्यात पूरग्रस्त महिलांचा संताप पाहायला मिळत आहे. या महिला थेट रस्त्यावर उतल्या आहेत. मुख्यमंत्री साहेबांचा निषेध असो, अशी जोरदार घोषणा देत महिला आक्रमक झाल्या आहेत. पुण्यात पूरग्रस्तस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी अनेकांचे संसार उघड्यावर आलेत, मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मात्र फक्त एकता नगरमधील नागरिकांनाच सरकारने मदत केलीय, आमच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पुलाची वाडी परिसरातील महिलांनी केला आहे.

पुण्यातील पूरग्रस्त महिलांचा आक्रमक पवित्रा

आम्ही मुख्यमंत्र्यांच्या सावत्र बहिणी आहोत, असं म्हणत पुण्यातील पुलाची वाडी या परिसरातील महिला यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच त्यांचा रोष व्यक्त (Pune Rain) केलाय. पुलाची वाडी या परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं. या ठिकाणी तीन तरूणांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला होता. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला भेट दिली नाही, असा आरोप या परिसरातील महिलांनी (Pune Rain) केलाय.

आम्ही मुख्यमंत्र्यांच्या सावत्र बहिणी...

मुख्यमंत्री पुण्यात येऊन याच रस्त्यावरून गेले, मात्र आमच्याकडे आले नाहीत. रात्री गाढ झोपेत असताना पाणी आलं आणि होत्याचं नव्हतं झालं, अशा अनेक संतप्त प्रतिक्रिया या महिलांनी आज व्यक्त केल्या (Womens Protest Against CM Eknath Shinde) आहेत. पुण्यातील पूरग्रस्त महिलांचा संताप समोर आलेला आहे. यावेळी महिलांनी एककडे मुख्यमंत्र्‍यांनी लाडकी बहीण योजना सुरू केलीय, तर दुसरीकडे आमच्याकडे दुर्लक्ष केल्याचं या महिलांनी म्हटलंय. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या सावत्र बहिणी असल्याचं देखील या महिला म्हणत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण

मुसळधार पावसाने पुण्याला चांगलंच झोडपून काढलंय. शहरात पूरग्रस्तस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांची मोठी दाणदाण उडाली होती. शेकडो कुटुंबांना पूराच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरीत देखील करण्यात आलं (Pulachi Wadi Flood) होतं. मुख्यमंत्री पुण्यात आले, परंतु पुलाची वाडी भागात भेट देण्यासाठी गेले नाहीत. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. महिला थेट रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यामुळे आता पुण्यात वातावरण तापल्याचं दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार...

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT