Unseasonal Rain Hits Pune Universit Exam Paper Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Rain: विद्यार्थ्यांचे भविष्य पाण्यात गेलं! पावसात उत्तरपत्रिका भिजल्या, पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी आक्रमक

Unseasonal Rain Hits Pune Universit Exam Paper: पुण्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. कारण या विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेच्या उत्तर पत्रिका पावसाच्या पाण्यात भिजल्या.

Priya More

Summary -

  • पुण्यात अवकाळी पावसाचा फटका

  • पुणे विद्यापीठात उत्तरपत्रिका पाण्यात भिजल्या

  • विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट

  • विद्यापीठाने नुकसान होणार नाही असे सांगितले

अक्षय बडवे, पुणे

पुणे शहरासह आसपासच्या परिसराला सोमवारी सायंकाळी अवकाळी पावसाने झोडपून काढलं. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली. वादळी वारा अन् गारांसह पाऊस झाला. या पावसामुळे पुण्यात अनेक ठिकाणी मोठं नुकसान झाले. या पावसाचा फटका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला बसला. विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पावसाच्या पाण्यात भिजल्या. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठात जागा नाही का? असा सवाल उपस्थित केला आहे.

उत्तर पत्रिका भिजल्या तरी देखील कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नसल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या उत्तर पत्रिका निकाली काढण्यासाठी संकलित केलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही असे स्पष्टीकरण विद्यापीठाने दिले आहे. विद्यापीठ अध्यादेशानुसार अधिकार मंडळामार्फत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कोणत्याही सत्राचा निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित उत्तर पत्रिका मूल्यमापन पुनर्मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकाली काढण्याची प्रक्रिया राबविण्यात येते. सध्या अशा उत्तरपत्रिका निकाली काढण्याची कार्यवाही सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित ठेकेदाराला देण्यात आले आहेत. या अंतर्गत उत्तर पत्रिका ताब्यात घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.

तर, या घटनेवर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 'जर विद्यापीठाला त्या उत्तरपत्रिका जर निकाली काढायच्या होत्या पण एखादा विद्यार्थी जर रिचेकिंगसाठी गेला म्हणजेच पुनर्मूल्यांकनसाठी गेला तर त्याला काय दाखवणार? म्हणजे तो विद्यार्थी नापास झाला त्याचे भविष्य पाण्यात गेलं.', अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थ्याने दिली. 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुनर्मूल्यांकनसाठी एवढे पैसे घेतात मग उत्तरपत्रिका ठेवण्यासाठी जागा नसणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. ऑनलाइन उत्तरपत्रिका अपलोड केल्या गेल्या आहेत का?,', अशी प्रतिक्रिया सुद्धा विद्यार्थ्यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

Pune Ganeshotsav: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT