Bomb Threat at Pune Railway Station :  
मुंबई/पुणे

Pune : पुणे रेल्वे स्टेशनसह ३ ठिकाणं बॉम्बने उडवणार, पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन

Bomb Threat at Pune Railway Station: पुण्यातील रेल्वे स्थानक, भोसरी आणि नव चैतन्य महिला मंडळ याठिकाणी बॉम्ब ठेवण्याची धमकी फोनवरून देण्यात आली. पोलिसांनी शोध मोहीम राबवत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसली तरी तपास सुरूच आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी

Bomb Threat at Pune Railway Station : पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देणार असल्याचा धमकीचा फोन पोलिसांच्या कंट्रोल रूमला आला अन् पुण्यात एकच खळबळ उडाली. पुणे रेल्वे स्टेशनसह पुण्यातील तीन ठिकाणे बॉम्बने उडवणार असल्याची धमकी फोनवर देण्यात आली होती. पोलिसांनी तात्काळ आढावा घेत शोध मोहिम हाती घेतली.

पुण्यातील भोसरी, नव चैतन्य महिला मंडळ आणि पुणे रेल्वे स्टेशन या तीन ठिकाणांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा फोन कॉल आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या ११२ या आपत्कालीन क्रमांकावर प्राप्त झाला. या धमकीमुळे शहरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने मोठी शोध मोहीम हाती घेतली आहे.

पुणे पोलिस, रेल्वे संरक्षण दल (RPF), स्थानिक लोहमार्ग पोलिस (GRP), आणि बॉम्ब शोध पथक (BDDS) यांनी संयुक्तपणे भोसरी, नव चैतन्य महिला मंडळ आणि पुणे रेल्वे स्टेशन परिसरात तपासणी केली. बंड गार्डन पोलिस, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि श्वान पथकाच्या सहाय्याने राबवलेल्या या मोहिमेत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. तरीही, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे स्थानकावरील बंदोबस्त वाढवण्यात आला.

प्राथमिक तपासात ही धमकी बनावट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सूत्रांनुसार, उल्हासनगर येथील एका महिलेने हा खोडसाळपणा केला असावा, अशी शक्यता तपासली जात आहे. या महिलेचा हेतू आणि धमकीमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आहे. धमकीचा कॉल कोठून आणि कुणी केला, याचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे. ही घटना गंभीर स्वरूपाची असून, पोलिसांनी याला प्राधान्य दिले आहे. यापूर्वीही पुणे रेल्वे स्टेशनला अशा धमक्या मिळाल्या होत्या, ज्या बनावट ठरल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT