Crime news Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Police : भर दिवसा दरोडा टाकला, पुणे पोलिसांनी सिने स्टाईल दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या

Pune Crime News : पुण्यात भर दिवसा दरोडा टाकणाऱ्या चोरांना पोलिस व ग्रामस्थांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडलं. ऊसामध्ये लपलेल्या चोरांना ड्रोनच्या मदतीने शोधण्यात आलं.

Alisha Khedekar

  • पुण्यात भर दिवसा दरोडा; पोलिस आणि तरुणांनी सिनेस्टाईल पाठलाग केला.

  • ऊसामध्ये लपलेल्या चोरांचा ड्रोनच्या मदतीने शोध घेऊन अटक केली.

  • दोन वर्षांपासून फरार असलेला टोळीचा म्होरक्या शेवटी पोलिसांच्या जाळ्यात.

  • पोलिस व ग्रामस्थांच्या धाडसी कामगिरीचं परिसरातून कौतुक होत आहे.

पुण्यात काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी २ वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात गुंडांच्या टोळीच्या म्होरक्याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर पुन्हा एकदा पुण्यात गावामध्ये भर दिवसा दरोडा टाकून पळालेल्या तीन चोरांना पोलीस आणि ग्रामस्थांनी सिनेस्टाईल पाठलाग करून चोरांच्या मुसक्या आवळल्या. पुणे पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या दौंडज गावामध्ये भर दिवसा काही दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरोडा टाकल्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला. मात्र दिवसा दरोडा टाकल्याने आजूबाजूला उपस्थित नागरिकांनी त्यांना पहिले. पुणे पंढरपूर मार्गावरील नीरा रेल्वे गेटवर या चोरांना काही तरुणांना अडवले.

मात्र या तरुणांना या चोरांनी रिवाल्वर दाखवून निसटले. या तीन चोरांना पकडण्यासाठी पोलीस आणि ग्रामस्थांनी सिनेस्टाईल पाठलाग केला. पाठलाग करणाऱ्या तरुणांना एक चोर पकडण्यात यश आलं. तर दोघेजण ऊसामध्ये लपून बसले होते. यानंतर पोलिसांनी ड्रोनच्या साह्याने ऊसात लपलेल्या या चोरांचा शोध घेतला आणि तरुणांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले. पोलीस आणि स्थानिक तरुण यांनी केलेल्या धाडसी कामगिरीचा परिसरातून कौतुक होताना पाहायला मिळते आहे, तर जेजुरी पोलीस याबाबत अधिकचा तपास करत आहेत.

पुणे पोलिसांनी कुख्यात गुंडांच्या टोळीच्या म्होरक्याच्या आवळल्या मुसक्या

लोणावळा उपविभागात पोलिसांना मिळलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२३ मध्ये हनुमान टेकडी परिसरात महिलांना व अल्पवयीन मुलींना पळवून आणून त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत. यावेळी दोन साथीदारांना अटक झाली, मात्र टोळीचा म्होरक्या फरार झाला होता. त्याने लोणावळा स्टेशन परिसरातून एका महिलेला पळवून नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले होते. तसेच घरात आणखी दोन अल्पवयीन मुलांना साखळदंडात डांबून ठेवण्यात आले होते. या नराधमाला पुणे पोलिसांनी जेरबंद केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Pak सामना खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना काळं फासणार, शिवसेना नेत्याचा इशारा

Maharashtra Politics: 'देवा तूच सांग' नाशिकमध्ये शरद पवार गटाने भाजपला डिवचले; शहरात 'या' बॅनरची चर्चा|VIDEO

India Vs Pakistan: थोड्याच वेळात महामुकाबला! सामन्यावर पावसाचे सावट? वाचा पिच रिपोर्ट काय सांगतो

Barvi Hills Tourism : कोकणची मजा बदलापूरमध्ये! मुंबईजवळचं Hidden Paradise, जंगल सफर, फोटोग्राफीची मजा एकाच ठिकाणी

kriti sanon: 'कभी नहीं सोचा था....'; क्रिती सॅननने पहिल्यांदाच काढला टॅटू, सांगितलं खास कारण

SCROLL FOR NEXT