Pune Purandar Airport case Villagers allege Saam Tv News
मुंबई/पुणे

Purandar : विमानतळाला जागा देण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध, पोलिसांचा लाठीचार्ज, धक्काबुक्कीत वृद्ध महिलेचा जीव गेल्याचा आरोप

Purandar Airport Villagers Allege Elderly Woman Died in Scuffle : पुरंदरमध्ये झालेल्या धक्काबुक्कीत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप देखील गावकऱ्यांनी केला आहे. अंजनाबाई कामठे असं या वृद्ध महिलेचं नाव आहे.

Prashant Patil

पुणे : पुण्यातील पुरंदर तालुक्यात होणाऱ्या प्रस्तावीत आतंरराष्ट्रीय विमानतळाला ७ गावातील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध होत आहे. सध्या शासनाकडून आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीचं ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू आहे. मात्र, बाधित सातही गावातील शेतकऱ्यांनी या ड्रोन सर्वेक्षणाला विरोध दर्शवला. अधिकाऱ्यांना सर्वेक्षणादरम्यान, वाट अडवल्यामुळे आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये अनेक शेतकरी रक्तबंबाळ झाले. या अमानुष कारवाईचा शेतकऱ्यांनी आणि स्थानिकांनी जाहीर निषेध केला आहे. तसेच या धक्काबुक्कीत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप देखील गावकऱ्यांनी केला आहे. अंजनाबाई कामठे असं या वृद्ध महिलेचं नाव आहे.

'पोलिसांना आमच्यावर लाठीचार्ज केला आहे. आम्ही अतिरेकी आहोत का? आमच्यावर लाठीचार्ज केला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. आमच्यावर गुन्हे दाखल केल्याचं' ग्रामस्थांनी म्हटलं आहे. प्रशासनामुळे आमच्या महिलेचा जीव गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 'याआधी अनेक आंदोलने उपोषणे केली मात्र, प्रशासनाने कोणतीही दाद दिली नाही. आता आमचा जीव गेला तरी चालेल पण माघार नाही', अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

Purandar Airport Villagers Allege Elderly Woman Died in Scuffle

पुरंदर विमानतळासाठी चालू असलेल्या ड्रोन सर्वेला देखील स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध सुरू आहे. यावेळी काही आंदोलक शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांची वाट अडवली. जनावरे आणि बैलगाड्या रस्त्यावर उभ्या करून शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी ड्रोन सर्वेवरून शेतकरी आणि शासन यांच्यात संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं.

स्थानिक शेतकरी ड्रोन सर्वेला विरोध करत असतानाच, आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे अनेक शेतकरी यात रक्तबंबाळ झाले. या अमानुष कारवाईचा शेतकऱ्यांनी आणि स्थानिकांनी जाहीर निषेध केला. विमानतळामुळे बाधित होणाऱ्या गावांमध्ये सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी अधिक आक्रमक होत असून, शेतकऱ्यांनी प्रशासनावर अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

SCROLL FOR NEXT