Pune Baramati Crime news साम टीव्ही मराठी
मुंबई/पुणे

Pune : खाकी डागाळली! PSI चे तरूणीवर लैंगिक अत्याचार; पोलीस उपनिरीक्षकासह दोघांवर गुन्हा दाखल

Pune Baramati crime : बारामतीमध्ये पोलीस भरतीत मदत करण्याचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपींवरील आरोपांची न्यायालयीन व पोलिस तपासातून पडताळणी होणे बाकी आहे.

Namdeo Kumbhar

मंगेश कचरे, बारामती प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Pune Baramati Crime news : पोलीस भरती आणि बँड्समन भरती परीक्षेत अधिक गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ कुंभार आणि बँड पोलीस कॉन्स्टेबल मारुती करे यांच्यावर बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणात तपास सुरू आहे.

यातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ कुंभार हे दौंड येथील राज्य राखीव पोलीस दलात (SRPF) कार्यरत आहेत, तर दुसरा आरोपी मारुती करे हा मुंबई पोलीस दलात बँड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. या घटनेनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. रक्षकच भक्षक झाल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.

आरोपींनी पीडितेचा विश्वास संपादन करून तिचे लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पीडितेने सुरुवातीला पोलिसांत धाव घेतली होती, मात्र तिथे दाद न मिळाल्याने तिने न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असूनही पोलीस प्रशासन आरोपींना अटक करत नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पोलिसांनी आरोपींना तात्काळ ताब्यात न घेतल्यास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा पीडितेने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

Pune Fort : पुण्याजवळ दडलाय इतिहासाचा खजिना! दोन डोंगरांवर वसलाय भव्य किल्ला

SCROLL FOR NEXT