Pune Porsche Car Accident Case Saam Digital
मुंबई/पुणे

Pune Porsche Car Accident: ससूनच्या शिपायाला ३ लाख रुपये कुणी आणि कुठे दिले?, CCTV तपासातून समोर आली मोठी अपडेट

Pune Kalyaninagar Car Accident: पुण्यातल्या कल्याणीनगर येथे झालेल्या कार अपघातामध्ये २ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणातील आरोपी मुलाच्या रक्तामध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णलयाच्या दोन डॉक्टरांसह शिपायाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे.

Priya More

नितीन पाटणकर, पुणे

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident) मोठी अपडेट समोर आली आहे. या अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या रक्ताच्या रिपोर्टमध्ये फेरफार करण्यासाठी ३ लाख रुपयांची देवाण-घेवाण झाली होती. आता ही पैशांची देवाण-घेवाण कुणे केली आणि कुठे झाली याबाबतची माहिती उघड झाली आहे. मुंबईतून अटक करण्यात आलेल्या अश्फाक मकानदारने ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) शिपायी अतुल घटकांबळे याला ३ लाख रुपये दिले होते. ही पैशांची देवाण-घेवाण बाल न्याय मंडळाच्या आवारात झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अतुल घटकांबलेला अश्फाक मकानदारनेच ३ लाख रुपये बाल न्याय मंडळाच्या आवारात दिले होते. पुणे पोलिसांनी सीसीटीव्ही जप्त केले आहेत. या सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना चित्रित झाल्याची माहिती समोर आली आहे. १९ मे रोजी बाल न्याय मंडळात या प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच पैशांची आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ससून रुग्णालयातील शिपाई अतुल घटकांबळेला अश्फाक मकानदारने येरवडा येथील बाल न्याय मंडळाच्या आवारात ३ लाख रुपये दिल्याची माहिती उघडकीस आली आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्या सांगण्यावरून अतुल घटकांबळेने हे पैसे स्वीकारले होते. याबाबतचे सीसीटीव्ही पोलिसांना मिळाले आहे. याप्रकरणात दिवसेंदिवस नवीन माहिती उघड होत आहे.

मुलाला १९ मे रोजी येरवड्यातील बाल न्याय मंडळाच्या आवारात हजर करण्यात आले होते. त्याच ठिकाणी अतुल घटकांबळेने अश्फाक मकानदार याच्याकडून ३ लाख रुपये घेतले होते. अश्फाक मकानदार दुचाकीवरून त्याठिकाणी आला होता. दुचाकीच्या डिक्कीत त्याने ही रक्कम ठेवली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी कैद केली आहे. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. त्यानुसारच पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

SCROLL FOR NEXT