Juvenile Justice Board Verdict On Kalyaninagar Accident Case Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Porsche Accident Verdict: बाल न्याय मंडळाच्या निकालात ट्विस्ट, पोलिसांनी नेमका काय आक्षेप नोंदवला? मोठी अपडेट आली समोर

Juvenile Justic Boards Verdict On Kalyaninagar Accident Case: न्यायालयाच्या निकालामध्ये जी नोटीस जारी केली गेली त्या नोटीसीवर ३ जजची स्वाक्षरी अपेक्षित आहे. पण त्यावर फक्त एकाच जजची स्वाक्षरी असल्याने पोलिसांनी (Pune Police) आक्षेप घेतला होता.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्यातील कल्याणीनगर (Pune Kalyani Nagar Accident) येथे झालेल्या अपघात प्रकरणात बाल न्याय मंडळाने दिलेल्या निकालामध्ये ट्विस्ट आला आहे. बाल न्या मंडळाच्या निकालावर पोलिसांनी आक्षेप नोंदवला. याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. न्यायालयाच्या निकालामध्ये जी नोटीस जारी केली गेली त्या नोटीसीवर ३ जजची स्वाक्षरी अपेक्षित आहे. पण त्यावर फक्त एकाच जजची स्वाक्षरी असल्याने पोलिसांनी (Pune Police) आक्षेप घेतला होता.

पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या कार अपघातामध्ये आरोपी कारचालकाला पहिल्या दिवशी अटक केली होती आणि त्यानंतर बाल न्याय मंडळामध्ये त्याला हजर करण्यात आले होते. बाल न्याय मंडळाने त्याला शिक्षा सुनावली होती ज्यामध्ये त्याला ३०० शब्दाचा निबंध लिहायला लावला होता. मात्र बाल न्याय मंडळाच्या निकालामध्ये एक ट्विस्ट समोर आला आहे. बाल न्याय मंडळाच्या निकालाला थेट पुणे पोलिसांनीच आक्षेप घेतला आहे.

बाल न्याय मंडळाच्या निकालामध्ये जी नोटीस जारी करण्यात आली होती. त्या नोटीसवर तीन जजच्या स्वाक्षरी अपेक्षित आहे. मात्र बाल न्याय मंडळाने रविवारी याप्रकरणामध्ये जो निकाल दिला त्यावर एकाच जजची स्वाक्षरी दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी हा निकाल अवैद्य ठरवून पुन्हा एकदा ही केस रीओपन केलेली आहे.

बाल न्याय मंडळामध्ये जी सुनावणी होते तेव्हा निकालावर तीन जजच्या सह्या या अनिवार्य आहे. परंतु कल्याणी नगर येथील अपघातामध्ये जी सुनावणी करण्यात आली या सुनावणीच्या नोटिसीवर फक्त एकाच जजची स्वाक्षरी दिसून येत आहे. त्यामुळे कुठेतरी हा निकाल ग्राह्य धरला जाऊ नये आणि हा निकाल अवैद्य ठरवावा अशी याचिका पुणे पोलिसांनी केली होती. ती मान्य करून हा निर्णय अवैद्य ठरवण्यात आलेला आहे.

आता पुन्हा नव्याने या केसवर सुनावणी होत आहे. ज्यामध्ये पोलिसांनी 185 कलम लावलेला आहे. आता दोन्ही पक्षातील युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. साडेचार वाजेपर्यंत बाल न्याय मंडळाने ही सुनावणी राखून ठेवलेली आहे. आता काही वेळातच निकाल येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

SCROLL FOR NEXT