Dr. Pallavi Sapale Committee Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Porsche Car Accident: ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार प्रकरण, सापळे समितीकडून ससून रुग्णालयात चौकशी सुरू

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुणे हिट अँड रन प्रकरणातील (Pune Hit And Run Case) आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणात ससून रुग्णालयाची (Sassoon Hospital) चौकशी करण्यासाठी सरकारने डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली तीन जणांची समिती नेमली आहे. ही समिती चौकशीसाठी ससून रुग्णालयामध्ये दाखल झाली असून या समितीने आपत्कालीन कक्षाची पाहणी केली. ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणाची चौकशी करून ही समिती आपला अहवाल सरकारला देणार आहेत.

पोर्शे कार अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला ससूनच्या आपत्कालीन कक्षात आणले होते. या संपूर्ण कक्षाची चौकशी समतीने पाहणी केली. त्याचसोबत मेडिकल चेकअपची प्रोसिजर फॉलो करताना आरोपी मुलाची नोंदणी ज्या रजिस्टरमध्ये करण्यात आली होती त्यांच्या नोंदी या चौकशी समितीने घेतल्या आहेत. सोबतच ज्या बेडवर झोपवून त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते त्या बेडची, कक्षाची आणि तिथल्या सीसीटीव्हीची पाहणी चौकशी समितीमार्फत केली जात आहे. त्याचसोबत ही समिती लॅबची देखील पाहणी करणार आहे.

घटनेच्या अनुक्रमाने ज्या ज्या व्यक्ती त्याच्याशी संबंधित असतील त्यांच्या चौकशी होईल. माझी नियुक्ती शासनाने केली आहे त्यामुळे याप्रकरणाचे उत्तर देण्याची सक्षम अधिकारी शासन आहे, अशी माहिती डॉ. पल्लवी सापळे यांनी ससून रुग्णालयाची पाहणी करण्यापूर्वी दिली होती. तसंच, 'शासन नियमानुसार आम्ही माहिती घेत आहोत. दिवसभर चौकशी सुरू राहील. आम्ही ससून रुग्णालयाकडून माहिती घेत आहोत. किती वेळ लागेल सांगता येत नाही.', अशी माहिती डॉ. पल्लवी सापळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

दरम्यान, पुणे अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचा आरोप करत पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हरलोर आणि शिपायी अमित घटकांबळे यांना अटक केली. कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातावेळी अल्पवयीन मुलगा हा मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवत होता. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेऊन त्याचे ब्लड सॅम्पल तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवले होते. पण याच ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळेच सरकारने याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. जे जे रुग्णालयाच्या डीन पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली ३ जणांची समिती नेमण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhau Kadam : कॉमेडी किंग भाऊ कदमचा सिरियल किलर अंदाज, मनोरंजनाची दिलखुलास पर्वणी पाहाच

Marathi News Live Updates : खासदार हेमंत सावरा यांच्या घराबाहेर ओबीसी संघटनेचे आंदोलन व घोषणाबाजी

Healthy Fruits: स्ट्रॅाबेरी ते अननस; ही आहेत पौष्टिक आणि निरोगी असणारी फळे

ताजमहालाच्या तळाशी आहेत 50 विहिरी, तुम्हाला माहितीये यामागील रहस्य!

VIDEO : थेट घरात घुसून महिलेवर अत्त्याचार; सुसंस्कृत पुण्यात पोलिसांचा धाक संपला?

SCROLL FOR NEXT