Pune Porsche Car Accident Case Update Saam TV
मुंबई/पुणे

Pune Porsche Case : अल्पवयीन मुलाचे ब्लड रिपोर्ट बदलणाऱ्या डॉक्टरची प्रकृती बिघडली; कोठडीत होतोय इन्फेक्शनचा त्रास

Pune Porsche Car Accident Case Update : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलणाऱ्या डॉक्टर श्रीहरी हळनोर याची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे.

Satish Daud

कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलणाऱ्या दोन डॉक्टरांना सोमवारी पोलिसांनी अटक केली. त्यांना कोर्टात हजर केलं असता, न्यायालयाने दोन्ही डॉक्टरांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मात्र, यातील एका डॉक्टरची पोलीस कोठडीत प्रकृती बिघडल्याची माहिती आहे.

डॉक्टर श्रीहरी हळनोर याला सध्या इन्फेक्शनचा त्रास होत आहे. अद्याप त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं नसून कोठडीतच ठेवण्यात आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कोठडीतच त्याच्यावर प्राथामिक उपचार करण्यात आले आहेत. सध्या पोलिसांकडून दोन्ही डॉक्टरांची कसून चौकशी केली जात आहे.

पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल याच्या मुलाने सुसाट कार चालवत कल्याणीनगर परिसरात एका दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या धडकेत दुचाकीस्वार तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातावेळी अल्पवयीन मुलगा नशेत असल्याचा आरोप करण्यात आला.

पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात तपासणीसाठी पाठवलं. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टर अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांनी अल्पवयीन मुलाचे ब्लड रिपोर्ट बदलले. आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याच्या सांगण्यावरुन दोघांनीही आरोपीच्या ब्लडमध्ये फेरफार केली.

यासाठी दोन्ही डॉक्टरांनी आरोपीच्या वडिलांकडून लाखो रुपये घेतले. ही बाब उघड होताच पोलिसांनी दोन्ही डॉक्टरांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केलं असता, दोघांनाही ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, पोलीस सध्या आरोपींची कसून चौकशी करत आहेत. चौकशीतून नेमकं काय सत्य समोर येतं? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सांगली-मिरजला पावसाने झोडपले,

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT